Marathi News> मनोरंजन
Advertisement

रेखाच्या प्रेमात हा बॉलिवूड अभिनेता आजही अविवाहीत

या गोष्टी ऐकल्यानंतर त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला.

 रेखाच्या प्रेमात हा बॉलिवूड अभिनेता आजही अविवाहीत

मुंबई : बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखाची क्रेझ तिच्या चाहत्यांमध्ये अजूनही कायम आहे. अनेक अभिनेत्यांना रेखाचे वेड होते, त्यामध्ये सलमान खानचे नाव देखील सामील होते.

सलमान खान अभिनेत्री रेखासाठी इतका वेडा होता की त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. लग्नाची इच्छाही त्याने मित्रांना सांगितली होती. दिग्गज अभिनेत्री रेखाने स्वत: सलमान खानसमोर हा किस्सा शेअर केला आहे. सलमान खानच्या शो 'बिग बॉस'मध्ये रेखा पाहुणी म्हणून पोहोचली होती, त्यादरम्यान अभिनेत्रीने हे गुपित उघड केले.

सलमान खानचे असे अनेक अफेअर्स आहेत, पण त्याबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. रेखाने 'बिग बॉस'मध्ये एक किस्सा शेअर करताना सांगितले की, सलमान तिला फॉलो करत असे, एकदा तो तिला फॉलो करून अभिनेत्रीच्या योगा क्लासला पोहोचला होता.

एवढंच नव्हे, तर रेखाला पाहण्यासाठी सलमान खानने योगा क्लास जॉईन केला होता. किस्सा शेअर करताना रेखाने सांगितले होते की, सलमान त्याच्या मित्रांना सांगत होता की तो रेखासोबत लग्न करेल.

रेखा जेव्हा सलमान खानबद्दलचा हा किस्सा शेअर करत होती तेव्हा अभिनेत्याने गंमतीत सांगितले की, तो रेखा यांच्यासाठी खूप वेडा आहे आणि रेखामुळे त्याने अजून कोणाशी लग्न केलेले नाही. यामुळेच तो आजपर्यंत अविवाहित आहे.

सलमान खानच्या या गोष्टी ऐकल्यानंतर त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला. आज पर्यंत सलमान खानच्या चाहत्यांना वाटत होते की सलमानचे पहिले प्रेम संगीता बिजलानी होती. रेखा नेहमीच सलमान खानला एका चांगला मित्र मानते. त्याचबरोबर सलमान नेहमीच रेखाला आदर देत आला आहे.

Read More