Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमान खानच्या हेट लिस्टमध्ये 'हे' 5 सुपरस्टार

सलमान खानचे 5 दुश्मन 

सलमान खानच्या हेट लिस्टमध्ये 'हे' 5 सुपरस्टार

मुंबई : बॉलिवूडचा सुल्तान म्हणजे सलमान खान याचा एक वेगळाच दबदबा आहे. सलमान कायम म्हणतो की, तो यारोंचा यार आहे आणि दुश्मनांचा दुश्मन. असं म्हटलं जातं की, सलमान खान ज्या व्यक्तीवर मेहरबान होतो त्याच नशीब अगदी बदलून जातं. मात्र ज्या व्यक्तींनी सलमान खानशी पंगा घेतला आहे. तुम्ही विश्वास नाही करणार पण त्या व्यक्तीचं फक्त आणि फक्त वाईट होतानाच पाहायला मिळालं आहे. इंडस्ट्रीतील सलमानची मैत्री आणि त्याच शत्रूत्व हे दोन्ही देखील खूप चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये अशा 5 व्यक्ती आहेत ज्यांनी सलमान खानशी पंगा घेतला आहे. बघूया कोण आहेत या 5 व्यक्ती ....

fallbacks

संजय लीला भन्साळी 

सलमान खानने संजय लीला भन्साळी या दिग्दर्शकासोबत काम केलं आहे. 'खामोशी' आणि 'हम दिल दे चुके सनम' हे दोन हिट सिनेमे सलमान खानने संजय लीला भन्साळीसोबत केलेत. मात्र एक वेळ अशी आली की या दोघांमध्ये जमेनास झालं. त्यांच्यात काही तरी बिनसल्याचं समोर आलं. एवढंच काय आता ते दोघं एकमेकांशी बोलत देखील नाही. त्यांच्या या वादानंतर दोघांनी एकमेकांसोबत एकही सिनेमा केलेला नाही. 

fallbacks

विवेक ओबरॉय 

इंडस्ट्रीत विवेक ओबरॉयला सलमान खानचा खूप मोठा शत्रू मानलं जातं. हे शत्रूत्व तेव्हापासून आहे जेव्हा सलमान आणि ऐश्वर्या रिलेशनशिपमध्ये होते. आणि विवेकने येऊन सगळा गोंधळ घातला होता. विवेकने असं काही केलं की इंडस्ट्रीमध्ये सलमान खानची बदनामी झाली. विवेकने पत्रकार परिषदेत सलमान बद्दल वाईट सांगितलं. यानंतर सलमानने विवेकला आपल्या शत्रूंच्या यादीत टाकलं. आणि आता हे दोघं एकमेकांसमोर येत नाहीत. सलमान खानशी पंगा घेणं विवेकला भारी पडलं हळू हळू त्याचं करिअर संपलं. 

fallbacks

अर्जून कपूर 

सलमान खानच्या शत्रूंच्या यादीत आताचा अर्जून कपूर देखील आहे. सलमान खानची वहिनी म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरासोबत अर्जून कपूरच नावं जोडलं गेलं होतं. दोघांना अनेकदा एकत्र देखील पाहिलं आहे. अर्जूनचं असं वागणं बघून स्वतः सलमान खान देखील गोंधळला. मलायका - अर्जूनसोबत नेमकं काय चालू आहे याबाबत विचारणा केली असता त्याने हे सगळं नाकारलं. पण ही गोष्ट खूप पुढे गेली. 

fallbacks

सरोज खान 

खूप लोकांना हे वाचून प्रेक्षकांना धक्का बसेल पण सरोज खान देखील सलमान खानला पसंद नाही. सलमान मोठा स्टार नव्हता तेव्हापासून त्यांच्या नात्यात एक अंतर आलंय सलमान खान जेव्हा 'अंदाज अपना अपना' या सिनेमांत काम करत होता. तेव्हा सरोज खान त्या सिनेमाची कोरिओग्राफी करत होता. सलमान खानला वाटलं की सरोज खान चांगली स्टेप्स शिकवत नाही. तेव्हा सलमान खान रागात आला आणि या दोघांमध्ये खूप मोठं भांडण झालं. तेव्हापासून हे दोघं एकमेकांशी अजिबातच बोलत नाही. 

fallbacks

अरिजीत सिंह 

बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक अरिजित सिंहदेखील सलमान खानच्या हेट लिस्टमध्ये आहे. एका अवॉर्ड फंक्शन दरम्यान सलमान - अरिजीतमध्ये वाद झाला. सलमान अरिजीतला म्हणाला की, तू झोपत होतास. तेव्हा अरिजीत म्हणाला की, तुम्ही मला झोपायला भाग पाडलं आहे. या वाक्यावरून सलमान खूप रागावला आणि त्याने आपल्या सुल्तान या सिनेमांतून अरिजीतच गाणं काढून टाकलं. यानंतर अरिजीतने सलमान खानची सोशल मीडियावर माफी देखील मांगितली पण सलमान खानने त्याला माफ केलं नाही. 

Read More