Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमानच्या रेस ३ चे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला...

सलमान खान, जॅकलिन फर्नांडीज स्टारर सिनेमा रेस ३ चे पहिले गाणे हिरिये प्रदर्शित झाले. 

सलमानच्या रेस ३ चे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला...

मुंबई : सलमान खान, जॅकलिन फर्नांडीज स्टारर सिनेमा रेस ३ चे पहिले गाणे हिरिये प्रदर्शित झाले. या गाण्यात सलमान आणि जॅकलिन एका डिस्को गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन रेमो डिसूजाने केले आहे. तर या गाण्याची कोरियोग्राफीही रेमो करत आहे. या गाण्याची खास गोष्ट म्हणजे यात जॅकलिनने पोल डान्स केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पोल डान्सचे व्हिडिओज, फोटोज जॅकलिन सोशल मीडियावर शेअर करत होती. तिचे हे टॅलेंट या गाण्यात दिसून येत आहे.

सलमान-जॅकलिनचा जलवा

रेस ३ च्या या गाण्याचे संगीत मीत ब्रदर्स यांनी केले असून गाणे पंजाबी सिंगर दीप मनी आणि नेहा भसीनने गायले आहे. दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला रेस ३ च्या ट्रेलरने युट्युबवर पहिले स्थान बळकावले आहे. सलमान-जॅकलिन यापूर्वी किक सिनेमात एकत्र आले होते आणि ही जोडी हॅंगओव्हर, जुम्मे की रात या गाण्यांवर एकत्र थिरकले आहेत.

पहा रेस ३ चे हे पहिले गाणे...

प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

हा सिनेमा १५ जूनला प्रदर्शित होणार आहे. रेस च्या पहिल्या दोन सिक्वलमध्ये सैफ अली खान प्रमुख भूमिकेत होता. तर रेस ३ मध्ये सलमान प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. सलमानच्या या सिनेमासाठी त्याचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. 

Read More