Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमानच्या खास अंदाजात प्रदर्शित झाले रेस ३ चे नवे गाणे...

सलमान खानच्या रेस ३ सिनेमाबद्दल त्याचे चाहते चांगलेच उत्सुक आहेत. 

सलमानच्या खास अंदाजात प्रदर्शित झाले रेस ३ चे नवे गाणे...

मुंबई : सलमान खानच्या रेस ३ सिनेमाबद्दल त्याचे चाहते चांगलेच उत्सुक आहेत. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचे नवे गाणे 'अल्‍लाह दुहाई है' प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे. हे गाणे रेस सीरीजच्या आतापर्यंत दोन सिनेमांचाही भाग होते. आता या सीरीजच्या तिसऱ्या सिनेमातही सर्व स्टार्स 'अल्‍लाह दुहाई है' करताना दिसणार आहेत.

गाण्यात सलमान खानसोबत सिनेमातील इतर कलाकारही दिसत आहेत. यावेळेस अल्लाह दुहाई है हे गाणे गायक अमित मिश्रा, जोनिता गांधी आणि श्रीरामा चंद्रने गायले आहे. तर राजा कुमारी यांनी गाण्याला रॅप दिला आहे. तुम्हीही पहा रेस ३ चे हे नवे गाणे...

रेमो डिसूजा दिग्दर्शित रेस ३ हा सिनेमा १५ जूनला प्रदर्शित होणार आहे. रेस सीरीजच्या पहिल्या दोन सिनेमात सैफ अली खान प्रमुख भूमिकेत होता. पण रेस ३ मध्ये सलमान खान झळकणार आहे. चाहत्यांबरोबरच सलमानही या सिनेमासाठी अत्यंत उत्सुक आहे. 

Read More