Marathi News> मनोरंजन
Advertisement

व्हिडिओ : थांबा... कराचीमध्ये बाईक पार्क करतोय तो सलमान खान नाही!

व्हिडिओ पाहिला तर तुम्हालाही हा सलमानच नाही, याची खात्री पटणार नाही... 

व्हिडिओ : थांबा... कराचीमध्ये बाईक पार्क करतोय तो सलमान खान नाही!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानसारखाच दिसणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. व्हिडिओ शेअर करणाऱ्या ट्विटर युझरनं दावा केलाय की सलमान खानसारखाच दिसणारा एक व्यक्ती पाकिस्तानच्या कराची शहरात दिसतोय. ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओत दावा करण्यात येतोय की सलमानसारखा दिसणारी ही व्यक्ती कराचीच्या गोल्डन मार्केटमध्ये दिसली. व्हिडिओ पाहिला तर तुम्हालाही हा सलमानच नाही, याची खात्री पटणार नाही... 

सलमानसारखीच हेअर स्टाईल आणि बॉडी असणारी ही व्यक्ती कराचीच्या बाजारात पार्किंगमध्ये ठेवलेल्या मोटारसायकल एका ठिकाणी व्यवस्थित उभ्या करायला मदत करतोय. ही व्यक्ती कोण आहे? आणि ती इथं काय करतेय? याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही. पण, सलमानसारखीच ही व्यक्ती दिसत असल्यानं भारतातच नाही तर पाकिस्तानातही त्याची चर्चा सुरू आहे. 

अभिनेता सलमान खान सध्या आपला आगामी सिनेमा 'भारत'च्या शुटिंग शेडुयलवर लक्ष केंद्रीत करतोय. या सिनेमात सलमानसोबत कतरीना कैफ, दिशा पटानी, तब्बू, सुनील ग्रोवर महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. ईदच्या निमित्तावर प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचा फर्स्ट लूक समोर आलाय. सिनेमाचा प्रोड्युसर अतुल अग्निहोत्री यानं सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केलाय. 

Read More