Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमान खानचं कधी होणार लग्न? अखेर अनिल कपूरने दिलं उत्तर

 'भाईजान' चढणार बोहल्यावर?

सलमान खानचं कधी होणार लग्न? अखेर अनिल कपूरने दिलं उत्तर

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. दबंग खानचा नवा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आणि तो कधी आपल्या भेटीस येणार अशी इच्छा सलमानच्या चाहत्यांना असते. एवढंच नाही तर भाईजान लग्न कधी करेल? कोणासोबत करेल? असे प्रश्न देखील त्याला अनेकदा विचारले जातात. सलमानच्या मित्रांना देखील त्याच्या खासगी आयुष्याबद्दल विचारलं जात. नुकताचं अरबाज खान स्टारर 'पिंच' शोमध्ये अभिनेता अनिल कपूर उपस्थित होता. तेव्हा अरबाजने अनिलला 2 प्रश्न विचारले. 

त्या दोन प्रश्नांमधील एक प्रश्न होता तो म्हणजे, सलमान लग्न कधी करेल. यावर अनिल म्हणला, 'माझ्यापेक्षा तुला जास्त चांगलं माहिती आहे. तो तुझा भाऊ आहे...' त्यानंतर अरबाज म्हणाला, 'घरातले सलमानला सांगून सांगून थकले....' अरबाजच्या या वक्तव्यानंतर अनिल म्हणाला, 'आमच्यात याविषयी बातचित होते. पण तोच काही उत्तर देत नाही तर आम्ही काय करणार...'

यावेळी अरबाजने अनिलला सलमानच्या लग्ना शिवाय कायम तरूण राहण्यामागे रहस्य काय आहे? असा प्रश्न विचारला... याप्रश्नावर अनिल बॉलिवूडच्या गाण्यातील काही ओळी म्हणाला, ' बहुत दिया देने वाले ने तुझको, आंचल ही ना समाए तो क्या कीजै.' सध्या अरबाजच्या शोचा हा एपिसोड तुफान व्हायरल होत आहे. 'पिंच' शोच्या माध्यमातून कलाकार त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासे करत आहे. 

Read More