Marathi News> मनोरंजन
Advertisement

लुलियाचं नशिब सलमान बदलणार तरी कसा, गर्लफ्रेंडसाठी लाखामोलाचा निर्णय

 लुलियाचं नशिब बदलणार?  

लुलियाचं नशिब सलमान बदलणार तरी कसा, गर्लफ्रेंडसाठी लाखामोलाचा निर्णय

मुंबई : अभिनेता सलमान खानने अनेकांना बॉलिवूडमध्ये नवीन संधी उपलब्ध करून त्यांच्या करियरसाठी एक मार्ग मोकळा करून दिला. बॉलिवूडमध्ये अनेकांचा गॉडफादर असलेल्या सलमानने त्याच्या गर्लफ्रेंडसाठी देखील मोलाचा निर्णय घेतला आहे. सलमान खान आणि गुलशन कुमार एक सॉन्ग रसिकांसाठी घेवून येणार आहेत. या गाण्याचं नाव 'मैं चला' असं आहे. 

महत्त्वाचं म्हणजे गाण्याला गायक गुरू रंघवा आणि सलमानची गर्लफ्रेंड सिंगर आणि मॉडेल लुलिया वंतूर आवाज देणार आहेत. गाणं 22 जानेवारी 2022 रोजी यूट्यूबच्या T-Series चॅनलवर प्रदर्शित होणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Iulia Vantur (@vanturiulia)

गुरु रंधावाने त्याच्या इंस्टाग्रामवर 'मैं चला' गाण्याचं पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये ‘#MainChala से प्यार जगेगा!  असं लिहिलं आहे. 

पोस्टरला आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. युलियाने देखील तिच्या इंस्टाग्रामवर गाण्याचं पोस्टर शेअर केलं आहे. सध्या सर्वत्र सलमानच्या गर्लफ्रेंडच्या नव्या गाण्याची चर्चा आहे. 

 

 

Read More