Marathi News> मनोरंजन
Advertisement

#MeToo: यौन शोषणचा आरोप करणाऱ्या सलोनी चोपडाला मिळाली मोठी ऑफर

साजिद खानवर केले होते गंभीर आरोप

#MeToo: यौन शोषणचा आरोप करणाऱ्या सलोनी चोपडाला मिळाली मोठी ऑफर

मुंबई : तनुश्री दत्तापासून सुरु झालेलं #MeToo ही चळवळ केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर यांच्यापासून दिग्दर्शक साजिद खानपर्यंत पोहोचलं. साजिद खानवर अभिनेत्री सलोनी चोपडाने यौन शोषणाचा आरोप केला. 2011 मध्ये हा सगळा प्रकार झाल्याचं तिने सांगितलं. साजिद खानला इंटरव्यू देण्यासाठी गेले असताना त्याने जे प्रश्न विचारले त्याने मी हैराण झाले. सलोनीने एक लेख लिहिला असून त्यात तिने साजिद खानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

सलोनी चोपडाने साजिद शिवाय तिचा एक्स बॉयफ्रेंड जेन खान दुर्रानी आणि विकास बहलवर देखील चुकीचं वर्तन केल्याचा आरोप तिने केला आहे. या सगळ्या प्रकरणानंतर आता अशी चर्चा आहे की, सलोनीच्या हाती एक नवीन टीव्ही सिरीअल लागली आहे. बॉलिवुड लाइफच्या बातमीनुसार 'एमटीव्हीवर लवकरच एस ऑफ स्पेस' नावाची एक रिअॅलिटी सीरीज सुरु होणार आहे. ज्यामध्ये मेकर्सने सलोनीला स्पर्धक म्हणून भाग घेण्याची ऑफर केली आहे.

सलोनीने काही दिवसांपूर्वीच जे आरोप आणि खुलासे केले आहेत त्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली आहे. यामुळे 'एस ऑफ स्पेस'च्या निर्मात्यांनी सलोनीला ऑफर केली आहे. सलोनी देखील यासाठी तयार झाली असून लवकरच ती या सिरीजमध्ये दिसणार आहे.

Read More