Marathi News> मनोरंजन
Advertisement

समांथानं मिटवली नागा चैतन्यची अखेरची निशाणी, दिग्दर्शकाला डेटिंग ठरलं कारण? चाहते म्हणाले...

Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूनं शेअर केलेल्या व्हिडीओला पाहताच नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा

समांथानं मिटवली नागा चैतन्यची अखेरची निशाणी, दिग्दर्शकाला डेटिंग ठरलं कारण? चाहते म्हणाले...

Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समांथानं चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. समांथा ही तिच्या कामापेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर आता तिचं नाव हे दिग्दर्शक राज निदिमोरूसोबत जोडण्यात येत आहे. ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातं आहे. इतकंच नाही तर ते एकत्र फोटो देखील शेअर करताना दिसतात. राजसोबत रिलेशनशिपच्या चर्चांमध्ये आता नागा चैतन्यची अखेरची निशाणी देखील काढून टाकली आहे. 

समांथा रुथ प्रभूनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये समांथानं एक बॅकलेस अर्थात डीप नेकचा ड्रेस परिधान केला आहे. या व्हिडीओमध्ये समांथा कॅमेऱ्या समोर 'नथिंग टू हाइड' (लपवण्यासाठी काहीही नाही) असं म्हटलं आहे. त्यानंतर ती जशी मागे वळते सगळ्यांचं लक्ष हे तिच्या मानेच्या जवळ असलेल्या टॅट्यू होता तिथे जातं. खरंतर तिच्या मानेच्या पाठच्या भागी अर्थात पाठीच्या जवळ YMC नावाचं टॅट्यू होता. तो आता गायब झाला आहे. हा टॅट्यू तिनं 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या डेब्यू चित्रपट Ye Maaya Chesave चा होता. याच चित्रपटाच्या सेटवर समांथा आणि नागा चैतन्य हे भेटले आणि त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली होती. महत्त्वाचं म्हणजे समांथानं खरंच टॅट्यू काढला की नाही की तिनं मेकअप केला आहे याविषयी काहीही माहिती समोर आलेली नाही. 

समांथाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट करत लिहिलं की बापरे समांथानं टॅट्यू काढून टाकला. दुसरा नेटकरी म्हणाला, तिनं टॅट्यू काढला नाही तर जाहिरातीसाठी मेकअपनं झाकला आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, तुझ्या पूर्वाश्रमीच्या नवऱ्याला भीती वाटत असेल. आणखी एक नेटकरी म्हणाला, हे शक्य नाही. अशा अनेक कमेंट्स असून समांथाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हेही वाचा : दोन मेगाबजट चित्रपटांना नकार देणारी दीपिका साऊथच्या 'या' सुपरस्टारसोबत झळकणार

दरम्यान, समांथा आणि नागा चैतन्य बरेच वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर  2017 मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीनं लग्न बंधनात अडकले. पण लग्नाच्या काही वर्षातच अर्थात 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 

Read More