Marathi News> मनोरंजन
Advertisement

'त्याच्या' खांद्यावर डोकं अन् चेहऱ्यावर गोड हसू; समांथाचा Cute Photo पाहून चाहत्यांनाही आनंद

Samantha Ruth Prabhu :  समांथा रुथ प्रभूनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे सगळीकडे चर्चा सुरु झाली. 

'त्याच्या' खांद्यावर डोकं अन् चेहऱ्यावर गोड हसू; समांथाचा Cute Photo पाहून चाहत्यांनाही आनंद

Samantha Ruth Prabhu : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. समांथाचं नाव 'राज एंड डीके' च्या राज निदिमोरूसोबत जोडण्यात येत आहे. आता तिनं दिग्दर्शकासोबत पोस्ट देखील शेअर करायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी तिनं एक पोस्ट शेअर करत नवीन सुरुवात करण्याची हिंट दिली होती. त्यामुळे तिचे चाहते हे बोलू लागले की तिनं तिचं नात कन्फर्म केलं आहे. आता तिनं राजसोबत नवीन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

समांथा रुथ प्रभूनं तिच्या प्रोडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट 'शुभम' साठी प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. 14 मे रोजी तिनं राज निदिमोरूसोबत काही फोटो शेअर केले. पहिल्या फोटोमध्ये ती राजसोबत एका चित्रपट थिएटरमध्ये पोज देताना दिसली. दुसऱ्या फोटोमध्ये ते कोणत्या गोष्टीवर चर्चा करताना दिसले. हे फोटो शेअर करत समांथा रुथनं कॅप्शन दिलं की 'आमच्यासोबत #SUBHAM पाहण्यासाठी, त्याची भावना समजून घेण्यासाठी आणि आनंद साजरा करण्यासाठी सगळ्यांचे आभार. हृद, मस्ती आणि विश्वासावर आधारीत असलेली एक नवीन कथा घेऊन येण्याकडे हा आमचा पहिला प्रयत्न आणि तो महत्त्वाचा आहे. आम्ही शुभमसोबत त्रालला मूव्हिंग पिक्चर्स आहेत. प्रवास सुरु झाला आहे. तर काय छान सुरुवात आहे.'

समांथाचं खासगी आयुष्य

दरम्यान, समांथा ही घटस्फोटीत आहे. तिचं पहिलं लग्न हे नागा चैतन्यशी झालं होतं. त्यांचा घटस्फोट झाला. तर घटस्फोटानंतर नागा चैतन्यनं शोभिता धुलिपालासोबत दुसरं लग्न केलं. आता अशी चर्चा आहे की समांथा देखील तिच्या आयुष्यात पुढे जाते. तर राज विषयी बोलायचं झालं तर रिपोर्ट्सनुसार, तो विवाहीत आहे आणि त्याला एक मुलगी देखील आहे. 

हेही वाचा : 63 वर्षांपूर्वीच ते गाणं; जे समुद्रकिनारी सिगारेटच्या पाकिटावर लिहिण्यात आलं अन् नंतर लतादीदींनी अजरामर केलं

समांथाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तिचा 2025 मध्ये 'शुभम' शिवाय Maa Inti Bangaram मध्ये दिसणार आहे. त्याचं शूटिंग अजूनही सुरु आहे. तिची एक हिंदी वेब सीरिज देखील आहे. त्याचं नाव 'Rakt Brahmand: The Bloody Kingdom' आहे. तर ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 

Read More