Marathi News> मनोरंजन
Advertisement

Raalia... रणबीरच्या भाचीकडून कुटुंबात आलियाचं जंगी स्वागत... तुम्हीही व्हाल आनंदी

'मामी जी के आ जाने से हमको भूल न जाना...' रणबीरची भाची करतेय नव्या मामीचं कुटुंबात स्वागत...  

Raalia... रणबीरच्या भाचीकडून कुटुंबात आलियाचं जंगी स्वागत... तुम्हीही व्हाल आनंदी

मुंबई :  अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टने 14 एप्रिल रोजी लग्न केलं आहे. लग्नापूर्वी दोघांच्या लग्नाची चर्चा तुफान रंगली होती. अत्यंत गुपित ठेवण्यात आलेल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताचं चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर दोघांनी लग्न केलं. लग्नात कुटुंब आणि मित्र परिवार उपस्थित होतं. कपूर कुटुंबाने तर आलियाचं सून म्हणून स्वागत केलं. पण रणबीरची भाची समायरा (Samara Sahni)ने देखील मामी आलियाचं जंगी स्वागत केलं. 

समायराने इन्स्टाग्रामवर  रणबीर आणि आलियाचा फोटो शेअर करत, कॅप्शनमध्ये 'कुटुंबामध्ये तुझं स्वागत आलिया मामी... आय लव्ह यू सो मच...' असं लिहिलं आहे. 

समायराच्या पोस्टवर आजी नितू कपूर आणि आई रिद्धीमा कपूर साहनीने कमेंट केलं आहे.... सध्या समायराची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पण समायराच्या पोस्टवर अद्याप आलियाने कमेंट केलेली नाही. त्यामुळे भाचीच्या  पोस्टवर आलिया काय कमेंट करेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे... आलिया भट्ट आणि रणबीरच्या लग्नात समायरा प्रत्येक फंक्शनमध्ये स्पॉट झाली होती. 

रणबीर आणि आलियाच्या लग्नापूर्वी समायरा अनेकवेळा कुटुंबासोबत डिनरला जाताना दिसली, ज्यामध्ये आलिया देखील तिच्यासोबत होती. त्यावेळी समोर आलेली फोटो पाहून हे स्पष्ट होते की, आलिया केवळ रिद्धिमा आणि नीतूसोबतच खास बॉन्ड शेअर करत नाही तर समायरासोबतही चांगले बॉन्ड शेअर करते.

Read More