Marathi News> मनोरंजन
Advertisement

'भावनेला भाषा नसते...', 'बाबा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

या चित्रपटातून संजय दत्तने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.

'भावनेला भाषा नसते...', 'बाबा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : आगामी बहुचर्चित 'बाबा' या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने 'बाबा' चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं आहे. संजय आणि मान्यता यांनी 'बाबा' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. 

'संजय.एस.दत्त प्रॉडक्शन्स' अंतर्गत 'ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स'सोबत त्यांनी चित्रपटाची सह-निर्मिती केली आहे. राज आर गुप्ता दिग्दर्शित 'बाबा' चित्रपटात 'भावनांना भाषा नसते' या आशयाने एका कुटुंबाची कथा साकारण्यात आली आहे. 'बाबा' येत्या २ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

'बाबा' चित्रपटातून 'तनु वेडस मनू' फेम अभिनेता दीपक दोब्रियाल प्रमुख भूमिका साकारणार असून त्याने या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. नंदिता धुरी पाटकर, स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर, आर्यन मेंघजी हेदेखील चित्रपटातून भूमिका साकारणार आहे. 

Read More