Marathi News> मनोरंजन
Advertisement

'नीट उभं राहता पण येत नाही!’ फुल नशेत संजय दत्तच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल

Sanjay Dutt and Wife Manyata Dutt's Video : संजय दत्त आणि त्याच्या पत्नीचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

'नीट उभं राहता पण येत नाही!’ फुल नशेत संजय दत्तच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल

Sanjay Dutt and Wife Manyata Dutt's Video : 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे संजय दत्त. संजय दत्तचे लूक्स त्यांची पर्सनॅलिटी आणि त्याचा अॅटिट्यूड अशा सगळ्या गोष्टींमुळे तो चर्चेत होता. त्या काळात त्याच्या लाखो महिला चाहत्या होत्या ज्या आजही त्याच्या प्रेमात आहेत. पण असं असलं तरी संजय दत्तचं प्रेम त्याची पत्नी मान्यता आहे. लग्नाच्या आधी त्याच्या अनेक गर्लफ्रेंड असल्या तरी त्याचा जीव हा मान्यतावर जडला. त्यात आता त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ते दोघं डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या या रोमॅन्टिक व्हिडीओची सगळीकडे चर्चा रंगली आहे. 

इन्स्टाग्रामवर संजय दत्तची पत्नी मान्यताच्या फॅन क्लबनं त्यांचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत संजय दत्तनं निळ्या रंगाचा टक्सीडो सूट परिधान केला आहे. तर त्याची पत्नी मान्यतानं काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा मिनी ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. दोघं या पार्टीत रोमॅन्टिक झाले आहेत. सोशल मीडियावर संजय आणि मान्यताचा हा व्हिडीओ प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. खरंतर संजय दत्त आणि मान्यताच्या या व्हिडीओवर नेटकरी भन्नाट कमेंट करत आहेत. 

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर एक नेटकरी म्हणाला, 'बाबा फूल टाइट आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'आम्हाला तर संजय सरांनी केलेल्या कामाचं कौतूक आहे.' जून ते सोनं. तिसरा नेटकरी म्हणाला, 'नवरा बायकोची जोडी ही कमाल आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'संजय दत्त नशेत असला तरी चांगला डान्स करतोय.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'भावातला खलनायक अजूनही जिवंत आहे.'

हेही वाचा : 'प्रियांका माझ्या हृदयात...'; जेव्हा शाहरुख खाननं अफेयरच्या चर्चांवर सोडलं मौन

दरम्यान, संजय दत्तनं 2008 मध्ये मान्यता दत्तशी गोवामध्ये लग्न केलं. लग्नाच्या आधी 2 वर्षे ते रिलेशनशिपमध्ये होते. संजय आणि मान्यता यांचं हे पहिलं लग्न नव्हतं. मान्यताचं पहिलं लग्न हे मेराज उर रहमानसोबत झालं होतं. तर संजय दत्तचं पहिलं लग्न हे रिचा शर्माशी झालं होतं. त्यांचं 1996 मध्ये ब्रेन ट्युमरमुळे निधन झालं. त्यानंतर संजय दत्तनं रिया पिल्लईसोबत दुसरं लग्न केलं. पण त्यांचं लग्न देखील जास्त काळ टिकलं नाही. त्यानंतर संजय आणि मान्यता यांचं लग्न झालं. त्यांना जुळी मुलं आहेत. त्यांची नावं इकरा आणि शहरान दत्त अशी आहेत.

Read More