Blockbuster Movies: सध्या ओटीटी आणि मल्टीप्लेक्सचा काळ आहे. 80 दशकामध्ये असे काही नव्हते. एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला की तो सिनेमा टॉकीजमध्ये जावून पाहण्यात एक वेगळाच आनंद होता. दरम्यान, 80 च्या दशकामध्ये एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये तीन दिग्गज सुपरस्टार एकत्र आले होते. त्यांचा हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती.
दरम्यान, आम्ही 'जीते हैं शान से' या चित्रपटाबद्दल बोलत आहोत. 1988 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, गोविंदा आणि संजय दत्त यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. तीन सुपरस्टार कलाकारांचा एकत्र चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी इतकी गर्दी केली होती की 2 आठवडे हा चित्रपट हाउसफुल होता. 14-15 दिवस थिएटरमध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होती.
त्यावेळी प्रेक्षक आपल्या आवडत्या कलाकारांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते. अनेकजण तिकीट खरेदीकरण्यासाठी रात्र-दिवस थिएटर बाहेर उभे राहायचे. मात्र, अनेकदा चित्रपट हाउसफुल होत असल्याने थिएटर बाहेर बोर्ड लावले जात होते. या चित्रपटाचे बजेट 2 कोटी इतके होते. परंतु, जेव्हा तीन सुपरस्टार कलाकारांनी एकत्र स्क्रीन शेअर केल्यानंतर हा चित्रपट प्रचंड सुपरहिट ठरला. या चित्रपटाने 8 कोटींची कमाई केली होती.
या चित्रपटात तीन सुपरस्टार कलाकारांसह मंदाकिनी आणि विजेता पंडित जी यांनी देखील मुख्य भूमिका साकारल्या होत्या. डैनी डेंगजोंगपा यांनी देखील चित्रपट चांगली भूमिका साकारली होती. या चित्रपटातील जुली, जुली, जॉनी का दिल तुम पर आया जुली ही गाणी प्रचंड हिट झाली होती. ही गाणी रस्त्यांवर, लग्नसमारंभात आणि रेडिओवर सतत वाजायची.
या चित्रपटात तीन मित्रांची कहाणी आहे. तीन मित्र एकत्र वाढलेले, एकत्र लढणारे असतात. त्यांचं ध्येय होतं समाजाची सेवा करणं. पण एक क्षण असा येतो जेव्हा त्यांच्यात गैरसमज निर्माण होतो आणि असामाजिक तत्वं त्याचा फायदा घेतात. दोस्ती, ड्रामा, ऍक्शन आणि इमोशन हे सर्व काही या चित्रपटामध्ये आहे.