Marathi News> मनोरंजन
Advertisement

तब्बल 14 वर्षांनी सिनेसृष्टीत परतणार 'हा' अभिनेता, फोटो पाहून आता ओळखणं अशक्य!

 'हिरामंडी' या वेबसीरिजच्या निमित्ताने संजय लीला भन्साळी हे ओटीटीवर पदार्पण करत आहेत. 'हिरामंडी' ही त्यांची पहिलीच वेबसीरिज असणार आहे. 

तब्बल 14 वर्षांनी सिनेसृष्टीत परतणार 'हा' अभिनेता, फोटो पाहून आता ओळखणं अशक्य!

Fardeen Khan Heeramandi New Poster : 'गोलियो की रासलीला राम-लीला', 'पद्मावत', 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटानंतर आता बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची बहुचर्चित 'हिरामंडी' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून 'हिरामंडी' या वेबसीरिजची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. सध्या या वेबसीरिजचे पोस्टर, गाणी, टीझर यांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच आता संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हिरामंडी' वेबसीरिजचे नवीन पोस्टर समोर आले आहे. 

'हिरामंडी'मधील आणखी कलाकारांचे लूक प्रदर्शित

'हिरामंडी' या वेबसीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला, अदिति राव हैदरी, रिचा चड्ढा, संजीदा शेख  आणि शर्मिन सेहगल या अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. त्यानंतर आता भन्साळी प्रोडक्शनने 'हिरामंडी' वेबसीरिजमधील आणखी कलाकारांचे फर्स्ट लूक प्रदर्शित केले होते. या पोस्टरवर अभिनेता फरदीन खान, शेखर सुमन, ताहा शाह आणि अध्ययन सुमन हे कलाकार झळकत आहेत. यात अभिनेता फरदीन खान हा गुलाबी रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान करुन राजेशाही थाटात बसल्याचे दिसत आहे. त्याच्या अंगावर शालही पाहायला मिळत आहे. तर शेखर सुमन यांच्या पात्राचाही पहिला लूक समोर आला आहे. यात ते मोठ्या रुबाबात दिसत आहेत. 

तब्बल 14 वर्षांनी सिनेसृष्टीत पुन्हा पदार्पण

त्यासोबतच ताहा शाह आणि अध्ययन सुमन या दोघांचीही पहिली झलक समोर आली आहे. यात हे दोघेही फारच वेगळ्या अंदाजात पाहायला मिळत आहे. या वेबसीरिजमध्ये हे चौघेजण कोणतं पात्र साकारणार, त्यांची नाव काय असणार, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण या चौघांच्या लूकमुळे या वेबसीरिजची उत्सुकता आणखीच वाढली आहे. विशेष म्हणजे 'हिरामंडी'च्या निमित्ताने अभिनेता फरदीन खान तब्बल 14 वर्षांनी सिनेसृष्टीत पुन्हा पदार्पण करत आहे. 

दरम्यान 'हिरामंडी' या वेबसीरिजच्या निमित्ताने संजय लीला भन्साळी हे ओटीटीवर पदार्पण करत आहेत. 'हिरामंडी' ही त्यांची पहिलीच वेबसीरिज असणार आहे. या सीरिजद्वारे स्वातंत्र्यापूर्वी वेश्यावस्तीतील जीवन कसं होतं, त्यांचा समाजात वावर कसा असायचा अशा स्त्रियांची कहाणी यातून मांडली जाणार आहे. 'हिरामंडी' ही वेबसीरिज येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. ही वेबसीरिज 190 देशात प्रदर्शित होणार असून याचे 8 भाग असणार आहेत. या सीरिजमध्ये ऋचा चड्ढा, सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला, अदिती राव हैदरी आणि संजीदा शेख महत्त्वपूर्ण भूमिकेत झळणार आहे. 

Read More