Marathi News> मनोरंजन
Advertisement

'संजू' सिनेमाची जोरदार कमाई, २०० कोटींचा टप्पा पार

अभिनेता रणबीर कपूरच्या 'संजू' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार गल्ला जमा झालाय. पहिल्याच आठवड्यात सिनेमाने अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. 

'संजू' सिनेमाची जोरदार कमाई, २०० कोटींचा टप्पा पार

मुंबई : अभिनेता रणबीर कपूरच्या 'संजू' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार गल्ला जमा झालाय. पहिल्याच आठवड्यात सिनेमाने अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. फक्त सात दिवसांत 'संजू' सिनेमाने २०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित या सिनेमाने आतापर्यंत २०२.५१ कोटी रुपयांची कमाई केला आहे. हा सिनेमा ३०० कोटींच्या घरात जाईल, अशी शक्यता आहे.

 'संजू' ने राजकुमार हिरानी यांच्याच ‘थ्री इडियट्स’ सिनेमाला कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. अमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’ चित्रपटाने एकूण २०२.४७ कोटींची कमाई केली होती.  'संजू' सिनेमाने २०२.५१ कोटींची कमाई करत आघाडी घेतली आहे, चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेय.

‘संजू सिनेमाने शुक्रवारी ३४.७५ कोटी, शनिवारी ३८.६० कोटी, रविवारी ४६.७१ कोटी, सोमवारी २३.३५ कोटी, मंगळवारी २२.१० कोटी, बुधवारी १८.९० कोटी आणि गुरुवारी १६.१० कोटींची कमाई केली आहे. एका आठवड्याच्या आत २०० कोटींहून जास्त कमाई करणार संजू सिनेमा तिसरा ठरला आहे. संजूच्या आधी बाहुबली-२ आणि ‘टायगर जिंदा है’ने हा रेकॉर्ड केला आहे. यासोबतच २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा रणबीरचा हा पहिला चित्रपट ठरला आहे.  

Read More