मुंबई : रणबीर कपूरच्या संजू सिनेमाने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. ओपनिंग डे ला या सिनेमाने 34.75 कोटींचा गल्ला करुन रेस ३ सिनेमाला मागे टाकले. आता या सिनेमाने नवा रेकॉर्ड केला आहे. आता संजू सिनेमाने वर्ल्ड बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा आकडा पार केला आहे.
हे यश संपूर्ण बॉलिवूडसाठी अभिमानास्पद आहे. तर देशातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने ३०० कोटींची मजल मारली आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या आकड्यांनुसार, संजू सिनेमाने सुरुवातीच्या १३ दिवसात २८५ कोटी रुपयांची कमाई केली होती. यानुसार, संजू हा सिनेमा २०१८ मधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरणार आहे. संजूची कमाई पाहता या सिनेमाने पद्मावतलाही मागे टाकले आहे. पद्मावतने बॉक्स ऑफिसवर २८२ कोटींची कमाई केली होती.
#Sanju continues its DREAM RUN... Crosses 500 cr mark worldwide [Gross BOC] after Week 2... Breakup:
— taran adarsh (@taran_adarsh) July 13, 2018
India Nett BOC: 295.18 cr
India Gross BOC: 378.43 cr
Overseas Gross BOC: 122 cr
Worldwide Gross total: 500.43 cr
संजू सिनेमातील रणबीर कपूरच्या अभिनयाचे भरभरून कौतूक होत आहे. आता रणबीर देखील सिनेमाचे यश एन्जॉय करत आहे.