Marathi News> मनोरंजन
Advertisement

संजूबाबाच्या 'प्रस्थानम' चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित

हा चित्रपट तेलुगू 'प्रस्थानम' चित्रपटाचा रिमेक आहे.  

संजूबाबाच्या 'प्रस्थानम' चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : 'यह गद्दी विरासत से नही, काबिलियत से मिलती हैं...' अशी टॅग लाईन असलेला संजूबाबाच्या 'प्रस्थानम' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे ट्रेलर आणि पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. चित्रपटाची कथा राजकारणा भोवती फिरताना दिसत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन देवा कट्टा यांनी केले आहे. चित्रपट २० डिसेंबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

चित्रपटात अभिनेता संजय दत्त बलदेव प्रताप सिंह ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. जो एक बाहुबली नेत्याच्या रूपात प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. चित्रपटात संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ यांच्यात चांगले मैत्री संबंध दाखवण्यात आले आहेत. 

होम प्रॉडक्शनच्या खाली साकारण्यात आलेल्या 'प्रस्थानम' चित्रपटामध्ये अनेक कलाकारांची मेजवानी चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. चित्रपटात संजय दत्त शिवाय अभिनेता जॅकी श्रॉफ, मनीषा कोयराला, चंकी पांडे आणि अली फजल हे कलाकार भूमिका साकारणार आहेत. 

Read More