Marathi News> मनोरंजन
Advertisement

मोनालिसाला चित्रपट ऑफर करणाऱ्या डायरेक्टरला बलात्कार प्रकरणात अटक; पीडिता म्हणाली, 'अश्लील Video..'

Director Who Offered Role To Monalisa: कुंभमेळ्यामध्ये फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झालेल्या मोनोलिसाला या दिग्दर्शकाने दिली आहे चित्रपटात काम करण्याची ऑफर

मोनालिसाला चित्रपट ऑफर करणाऱ्या डायरेक्टरला बलात्कार प्रकरणात अटक; पीडिता म्हणाली, 'अश्लील Video..'

Director Who Offered Role To Monalisa: प्रयागराज येथे पार पडलेल्या कुंभमेळ्यामध्ये फोटो व्हायरल झालेल्या मोनालिसा नावाची तरुणी पुन्हा चर्चेत आली आहे. मात्र ही व्हायरल तरुणी चर्चेत येण्यामागील कारण ती स्वत: नसून तिला चित्रपटाची ऑफर करणारा दिग्दर्शक आहे. मोनालिसा व्हायरल झाल्यानंतर चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्राने तिला एका चित्रपट देखील ऑफर केला. मात्र आता सनोज मिश्रासंदर्भात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्लीमधील एका तरुणीवर बलात्कार केल्याप्ककरणी सनोज मिश्राला अटक करण्यात आली आहे. एका छोट्या शहरात राहणाऱ्या तरूणीने या दिग्दर्शकाने आपल्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. मला फिल्म स्टार बनवण्याचे अमिष दाखवून सनोज मिश्राने माझ्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे.

या तरुणीने काय आरोप केले?

मी 2020 मध्ये टिकटॉक आणि इंस्ट्राग्रामच्या माध्यमातून सनोज मिश्रा यांच्या संपर्कात आले. तेव्हा ती झाँशी येथे राहत होती, असं पीडित तरूणीने पोलि‍सांना दिलेल्या माहितीमध्ये सांगितल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. "काही काळानंतर आम्ही एकमेकांशी नियमितपणे बोलू लागलो, असंही या तरुणीने पोलिसांना सांगितलं. 17 जून 2021 रोजी मिश्राने तिला कॉल केला आणि आपण झाँशी रेल्वे स्थानकावर असल्याचा दावा केला. पण या तरुणीने त्याला भेटण्यास नकार दिला, तेव्हा मिश्राने "तू भेटायला आली नाही तर मी आत्महत्या करेन", अशी धमकी दिल्याचा दावा या तरुणीने केला आहे.

अश्लील व्हिडीओ काढून लैंगिक अत्याचार

या धमकीला घाबरून पीडित तरूणी त्याला दुसर्‍या दिवशी भेटण्यास तयार झाली. 18 जून 2021 रोजी मिश्रा या तरुणीला रिसॉर्टवर घेऊन गेला आणि तेथी तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याने पीडितेवर अत्याचार करतानाचे अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केले आहेत. वारंवार शरीरसुखाची मागणी सनोज मिश्रा करुन लागला. तसेच आपल्या मागणीला विरोध केला तर ते व्हिडीओ लीक करण्याची धमकी सनोज मिश्रा या तरुणीला दिली. लग्नाचे तसेच चित्रपटात भूमिका देण्याचे खोटे आश्वासन देऊन सनोज मिश्रा वारंवार माझे लैंगिक शोषण करत राहिला, असं पीडितेने म्हटलं आहे.

मोनालिसाला चित्रपटाची ऑफर

महाकुंभमेळा 2025 मध्ये व्हायरल झालेल्या मोनालिसाला चित्रपटाची ऑफर दिल्यानंतर सनोज मिश्रा राष्ट्रीय स्तरावर चांगलाच चर्चेत आला होता. कुंभमेळ्यात मोनालिसाच्या सौंदर्याची जोरदार चर्चा झाली होती, तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. मोनालिसाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सनोज मिश्राकडून तिला चित्रपटाची ऑफर मिळाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

अनेक चित्रपटांचं केलंय दिग्दर्शन

काही दिवसांनंतर सनोज मिश्राने देखील आगामी चित्रपट 'द डायरी ऑफ मनीपूर'मध्ये मोनालिसाला संधी देणार असल्याचे जाहीर केले. सनोज मिश्राने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे, ज्यामध्ये 'गांधीगिरी', 'राम की जन्मभूमी', 'लफंगे नवाब', 'धर्म के सौदागर', आणि 'काशी टू काश्मीर' अशा चित्रपटांचा समावेश आहे.  आपण मोनालिसाला अभिनयाचे प्रशिक्षण देणार असल्याचेही सनोज मिश्राने जाहीर केले होते. सनोज मिश्रा मोनालिसाला घेऊन काही कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी झाला होता.

Read More