Marathi News> मनोरंजन
Advertisement

मिक्सरमध्ये अडकून 'दंगल गर्ल'चं कापलं बोट, करावी लागली सर्जरी

घरात एकटी असताना घडला हा प्रकार 

मिक्सरमध्ये अडकून 'दंगल गर्ल'चं कापलं बोट, करावी लागली सर्जरी

मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सान्या म्हलोत्राने Sanya Malhotra सोशल मीडियावर आपला एक फोटो शेअर केली आहे. या फोटोत सान्याच्या हाताला दुखापत झाल्याचं दिसतंय. सध्या लॉकडाऊनमध्ये सगळेचजण घरी आहेत. घरची काम करताना सान्याच्या बोटाला मोठी दुखापत झाली आहे. मिक्सरमध्ये अडकून सान्याच्या हाताच्या करंगळीला गंभीर दुखापत झाली आहे. 

अचानक मिक्सरमध्ये चटणी वाटत असताना दुखापत झाल्यामुळे सान्याला तात्काळ रूग्णालयात नेण्यात आलं. यावेळी बोटाला मिक्सरचा ब्लेड लागल्यामुळे दुखापत झाली. त्यामुळे तात्काळ सर्जरी करावी लागली. 

लॉकडाऊनमध्ये सान्या एकटीच घरी आहे. यावेळी ती चटणी बनवत असताना ही दुखापत झाली आहे. तर झालं असं मिक्सरच्या भांड्यात चटणीची सामुग्री भरली. झाकण लावण्याच्या अगोदरच तिने बटण सुरू केलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Mah house mah rulezzzz @harshita02

A post shared by Sanya Malhotra (@sanyamalhotra_) on

अशावेळी भांड्यातील सगळ्या गोष्टी इथे तिथे उडू लागल्या. हे सावरताना झाकण लावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तिच्या हाताच्या करंगळीला ब्लेड लागल्यामुळे मोठी दुखापत झाली. 

यानंतर सान्या जवळपास बेशु्ध्दच झाली होती. तिच्या हातातून भरपूर रक्तस्त्राव झाला. त्या अवस्थेत तिने मित्राला फोन करून घरी बोलवलं. आणखी एका मित्राच्या मदतीने तिला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. 

सर्वात अगोदर तिची कोरोनाची तपासणी करण्यात आली. चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या करंगळीला दोन फ्रॅक्चर असून तीन मोठ्या जखमा झाल्या आहेत. 

या अपघातानंतर सान्याची जुनी रूममेट हर्षिता कालराने सान्याला आपल्यासोबत ठेवलं आहे. चौथ्या लॉकडाऊननंतर काही नियम शिथिल करण्यात आले तेव्हा तिने दिल्लीत आई-वडिलांकडे जाण्याचा निर्णय घेतला. 

Read More