Marathi News> मनोरंजन
Advertisement

सपनाचा टल्ली होऊन डान्स, काही तासातच एवढे व्ह्यूज

अभिनेत्री आणि गायक सपना चौधरी नेहमीच तिच्या डान्सच्या हटके अंदाजामुळे चर्चेत असते.

सपनाचा टल्ली होऊन डान्स, काही तासातच एवढे व्ह्यूज

मुंबई : अभिनेत्री आणि गायक सपना चौधरी नेहमीच तिच्या डान्सच्या हटके अंदाजामुळे चर्चेत असते. सपना जेवढी तिच्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे तितकीच सोशल मीडियावर सक्रीय आहे. सपनाचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खुद्द सपनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताच तिचे डान्सचे कौशल्य पाहण्यासाठी अनेक चाहते आतूर झाले. व्हिडिओ पोस्ट होताच काही तासातच तिच्या डान्सला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. 

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत सपना कॅप्शनमध्ये म्हणते की, 'डान्स असा करा की तुम्हाला कोणी पाहत नाही. त्यामुळे मी डान्स करताना कधीच धकत नाही.' सपना नेहमीच तिची व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 

डान्स आणि अभिनयानंतर सपनाने गायन क्षेत्रात देखील पदार्पण केले आहे. तिच्या आवाजात स्वरबद्द करण्यात आलेल्या गाण्यांना चाहत्यांनी चांगलेच डोक्यावर घेतले आहे. सपना चौधरी आणि दलेर मेंहदी यांच्या आवाजात स्वरबद्द करण्यात आलेल्या 'बावली तरेड' गाण्याला यूट्यूबवर चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती.  

Read More