Marathi News> मनोरंजन
Advertisement

सारा अली खान - सुशांत राजपूत बॉलिवूडचं नवं 'लव्हबर्ड्स'?

सुशांत-साराच्या डेटिंगच्या बातम्यांना सुरुवात झाली, त्याचं कारणही खास आहे

सारा अली खान - सुशांत राजपूत बॉलिवूडचं नवं 'लव्हबर्ड्स'?

मुंबई : सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत यांच्यात 'केदारनाथ' चित्रपटादरम्यान चांगली मैत्री झाली. नुकताच सुशांतच्या वाढदिवसानिमित्ताने सारा आणि सुशांत एकत्र वेळ घालवला. सारानं इतर कामं बाजूला ठेवून सुशांतचा वाढदिवस सादरा केला. दोघांनी सोबत डीनरही केला आणि सुशांतनं साराला घरीदेखील सोडलं. दोघांचं एकमेकांसोबत वेळ घालवणं पाहून सारा-सुशांत या 'लव्ह बर्ड'मध्ये काहीतरी शिजतंय अशी चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सारा अली खानच्या जवळच्या सूत्रांनी मात्र सारा-सुशांतच्या प्रेमाच्या गोष्टी अफवा असल्याचं म्हटलंय. सारा आणि सुशांत केवळ चांगले 'फ्रेन्डस' आहेत आणि दोघं एकमेकांच्या संपर्कात असतात म्हणून काही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलेत असा त्याचा अर्थ निघत नाही, असं त्यांनी म्हटलंय.

fallbacks
केदारनाथ

सुशांत-साराच्या डेटिंगच्या बातम्यांना सुरुवात झाली, त्याचं कारणही खास आहे. कारण सुशांतचा वाढदिवस सारानं खास पद्धतीनं साजरा केला. हा क्षण सेलिब्रेट करण्यासाठी सारानं आपली देहरादूनची ट्रीप रद्द केली आणि हा वेळ सुशांतसोबत व्यतीत केला. 

उल्लेखनीय म्हणजे, काही दिवसांपूर्वी सारा अली खाननं बॉलिवूडचा हॅन्डसम हंक कार्तिक आर्यन आपला 'क्रश' असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सुशांतसोबत साराची वाढती जवळिक चर्चेत आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

Read More