Marathi News> मनोरंजन
Advertisement

Sara ali Khan ने केलं गुपचूप लग्न? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

सध्या सगळेच सेलिब्रिटी सोशल मीडियावर सक्रिय आहेत

Sara ali Khan ने केलं गुपचूप लग्न? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

मुंबई : सोशल मीडिया हे एक असं माध्यम आहे, जेथे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच लोकं सक्रिय असतात. येथे तुम्ही तुमचे फोटो, व्हिडीओसारखे काही कंटेन्ट शेअर करता. एवढेच काय तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत गप्पा देखील मारु शकता. तसेच तुमच्या आवडचा कोणताही कंटेन्ट तुम्हाला येथे पाहायला मिळतो. लोकं सोशल मीडियावर आपल्या जवळच्या व्यक्तीला किंवा आवडत्या सेलिब्रिटीला फॉलो करतात. ज्यामुळे ते त्यांच्या खासगी आयुष्यात काय करतात? यासंबंधीत माहिती मिळते.

सध्या सगळेच सेलिब्रिटी सोशल मीडियावर सक्रिय आहेत आणि आपल्या चाहत्यांसाठी ते काहीना काही कंटेन्ट शेअर करत असतात. जे पाहून चाहत्यांचे देखील मनोरंजन होते.

नुकतेच 'अतरंगी रे' चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. ज्यामध्ये सारा अली खान, धनुष आणि अक्षय कुमार यांनी काम केलं आहे. ज्याची सर्वत्र चर्चा होत आहेत. साराचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आल्यानंतर आता सोशल मीडियावर तिच्या लग्नाची चर्चा होत आहे.

कतरिनानंतर साराने आता लग्न केलं का? सारा आपला सिनेमा येण्याची वाट पाहत होती का? आणि आता सिनेमा आल्यानंतर तिने लग्न केलं का? असा सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे.

साराच्या लग्नाची का होतेय चर्चा?

सोशल मीडियावर साराचा फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने तिच्या डोक्यात सिंदूर भरलं आहे. ज्यामुळे ती नववधू सारखी दिसत आहे. हा फोटो पाहून अभिनेत्रीने गुपचूप लग्न केल्याच्या अफवा पसरत आहेत. परंतु या फोटोमागील सत्य काही वेगळं आहे.

या व्हायरल फोटोमध्ये साराचा हा फोटो विकी कौशल सोबतचा आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये दोघेही अशा प्रकारे एकत्र उभे आहेत की, दोघेही पती-पत्नी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा सिनेमा एका सिनेमातील आहे.

fallbacks

फॅनने हा फोटो शेअर केला आहे

हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला जेव्हा एका चाहत्याने ते मनोरंजक कॅप्शनसह शेअर केले. फॅनने कॅप्शनमध्ये लिहिले- 'फोटोमध्ये सारा आणि विकी कपलसारखे दिसत आहेत.' या फोटोमध्ये साराने हिरव्या रंगाचा प्रिंटेड दुपट्टा घातला आहे, तर विकीने निळ्या रंगाच्या टी-शर्टसह लाल रंगाचे जाकॅट घातले आहे.

हा फोटो व्हायरल होताच चाहते खूप खुश झाले आहेत. हा फोटो समोर येण्यापूर्वी, विकी आणि सारा इंदूरच्या रस्त्यावर बाईकवर एकत्र फिरताना दिसले. त्यावेळी देखील त्या फोटोंची चर्चा झाली, ज्यानंतर आता साराच्या या सिंदूर लावलेल्या फोटोची चर्चा होऊ लागली आहे.

fallbacks

'लुका छुपी पार्ट 2'

सारा अली खान आणि विकी कौशलचा हा व्हायरल झालेला फोटो त्यांच्या आगामी चित्रपटामधील आहे. सारा आणि विकी कौशल हे 'लुका छुपी पार्ट 2' या चित्रपटात दिसणार असल्याच्या बातम्या आहेत. त्यामुळे हा फोटो या चित्रपटातील असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read More