Marathi News> मनोरंजन
Advertisement

सारा अली खान पुन्हा एकदा गुवाहाटीच्या कामाख्या देवी दर्शनाला; बोटीत बसून घेतला ब्रह्मपुत्रा नदीचा आनंद

Sara Ali Khan: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आपल्या आध्यात्मिक प्रवासांबद्दल नेहमीच सोशल मीडियावर अपडेट देत असते. नुकतंच तिने नवरात्रीच्या निमित्ताने गुवाहाटीतील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिराला भेट दिली. ती देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गुवाहाटीत पोहोचली होती.   

सारा अली खान पुन्हा एकदा गुवाहाटीच्या कामाख्या देवी दर्शनाला; बोटीत बसून घेतला ब्रह्मपुत्रा नदीचा आनंद

साराने आपल्या इन्स्टाग्रामवर नेहमीच आपल्या प्रवासाचे फोटो शेअर करत असते. या ही वेळेस साराने आपल्या गुवाहाटी दौऱ्याचे फोटोज शेअर केले आहे. मंदिर भेटीदरम्यान तिने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा आणि दुपट्टा परिधान केला होता. काही फोटोंमध्ये ती बोटीवर बसून कॅमेऱ्यासमोर पोज देत असल्याचं दिसत आहे, तर एकामध्ये ती ध्यानाला बसलेली दिसली. एका फोटोमध्ये ती चेहरा अर्धवट झाकून मंदिराच्या दिशेने चालताना दिसते आणि एका अंतिम फोटोमध्ये ती मंदिरात आशीर्वाद घेताना दिसते. तिच्यासोबत असलेली दुसरी व्यक्तीदेखील या प्रार्थनेत सहभागी झालेली होती. या फोटोमध्ये तिच्या बाजूला असलेली व्यक्ती कोण, हे ओळखू येत नसल्याने चाहत्यांनी साराला अनेक प्रश्न विचारले आहे. 

या फोटोंसोबत साराने कॅप्शनमध्ये एक सुंदर कविता देखील शेअर केली आहे. ज्यात ती आपल्या चाहत्यांना जीवन स्वीकारण्याचा आणि शांतता शोधण्याचा सल्ला देते. तिने लिहिले आहे, 'सतत प्रवाहात शांततेचे क्षण... श्वास घेण्याची आणि थोडं थांबण्याची एक आठवण. नदीचा आवाज ऐका, सूर्यप्रकाशाची चमक अनुभवा, जीवनाला आलिंगन द्या आणि स्वतःला वाढू द्या.'
( Moments of stillness amidst the perpetual flow, A purposeful reminder to breathe and go slow, Listen to the whispers of the river, feel the suns glow, Wander deep, embrace life and allow yourself to grow )

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

याआधी, यावर्षी फेब्रुवारी महिन्यात साराने झारखंडमधील देवघर येथील बैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरालाही भेट दिली होती. त्या वेळचे फोटोही तिने इन्स्टाग्रामवर शेअर करत 'जय बाबा वैद्यनाथ' असे कॅप्शन दिले होते. सारा तिच्या आध्यात्मिक प्रवासामुळे चाहत्यांमध्ये वेगळ्या प्रकारे ओळखली जाते आणि ती नेहमीच पवित्र स्थळांना भेट देत असते.

सारा अली खान ही प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी आहे. तिचे बॉलिवूडमधील पदार्पण 2018 मध्ये 'केदारनाथ' या चित्रपटातून झाले. ज्यात तिने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत काम केलं होतं. तिच्या अभिनयशैलीसाठी तिला पहिल्याच चित्रपटात प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर 'सिंबा', 'लव आज कल', 'अतरंगी रे' अशा विविध चित्रपटांमध्ये तिने आपली छाप सोडली.

सारा तिच्या बोल्ड आणि बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. ती तिच्या फॅशन सेन्ससोबतच तिच्या खऱ्या आणि साध्या व्यक्तिमत्त्वासाठीही लोकप्रिय आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर ती आयुष्याच्या प्रत्येक टप्पे म्हणजेच प्रवास, शूटिंग, कुटुंब, योगा आणि अध्यात्म याबाबत अपडेट्स शेअर करत असते.

Read More