Marathi News> मनोरंजन
Advertisement

सारा आणि इब्राहिमचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्री सारा अली खान पुन्हा एकदा प्रकाशझोतात...

सारा आणि इब्राहिमचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई : 'सिम्बा' आणि 'केदारनाथ' यासारख्या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये स्वत:च एक वेगळे अस्तित्व निर्माण करणारी सारा नेहमीच सोशल मीडियावर एक्टिव असते. सोशल मीडियावर स्टार किडच्या चर्चा या वाऱ्यासारख्या पसरत असतात. स्टार किडच्या जीवनात काय सुरू आहे काय नाही, ही माहिती जाणून घेण्यास नेटकऱ्यांना फार उत्सुकता असते.

'सिंबा' गर्ल अभिनेत्री सारा अली खान सध्या तिचा आगामी चित्रपट 'लव आजकल २' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. साराने काही दिवसापुर्वी अभिनेता कार्तिक आर्यनबरोबरचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते. 

 

fallbacks

यानंतर सारा पुन्हा एका प्रकाशझोतात आली आहे. साराने तिचा भाऊ इब्राहिमसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. साराच्या या फोटोंना नेटकऱ्यांची जास्त पसंती मिळत आहे. या फोटोमध्ये बहीण-भावाची जोडी फार छान वाटत आहे. फोटोमध्ये दोघांच्या चेहऱ्यावरून असं वाटत आहे की, भावंडांमध्ये प्रेमाचे आणि आपुलकीचे नाते आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I smile because you’re my brother ...I laugh because there’s nothing you can do about it 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

'मैं खुश हूं क्योंकि तुम मेरे भाई हो... मैं हंस रही हूं क्योंकि इसको लेकर तुम कुछ नहीं कर सकते...' असे कॅप्शन साराने फोटोला दिले आहे. साराने काही दिवसांपूर्वीच कार्तिक आर्यनसोबत चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केले होते. सारा सध्या तिच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसत आहे. 'केदारनाथ' या चित्रपटद्वारे साराने प्रेक्षकांचे मन जिंकली होती. यानंतर 'सिम्बा' चित्रपटमधील तिचा अभिनयनही अनेकांना भावला होता. 

Read More