Marathi News> मनोरंजन
Advertisement

Viral video : 'सात समंदर..' गाण्यावर ठुमकली सारा अली खान, सोशल मीडियात फोटो व्हायरल

सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा अली खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Viral video : 'सात समंदर..' गाण्यावर ठुमकली सारा अली खान, सोशल मीडियात फोटो व्हायरल

मुंबई : सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा अली खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'केदारनाथ' या चित्रपटातून सारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र त्यापूर्वी साराचा एका लग्नसोहळ्यातील खास डान्स व्हिडिओ  सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

व्हिडिओ व्हायरल 

सोशल मीडियावर सारा अली खानचा ' सात समंदर ..' या गाण्याचा खास व्हिडिओ झपाट्याने शेअर होत आहे. पांढर्‍या रंगाच्या साडीत सारा या गाण्यावर ठुमकताना दिसत आहे. 

 

व्हिडियो फॅशन डिजाइनर संदीप खोसला यांच्या भाजीच्या म्हणजेच सौदामिनी मट्टूच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सारा अली खान सहभागी झाली होती. यासोबतच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील हजर होते.  

सारा अली खान लवकरच 'सिम्बा'मध्ये  

'केदारनाथ' चित्रपटामध्ये सारा अली खान सुशांतसिंग रजपूतसोबत झळकणार आहे. तर त्यानंतर रणवीर सिंह सोबत 'सिम्बा' या चित्रपटातही सारा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. 

Read More