Marathi News> मनोरंजन
Advertisement

Sara Tendulkar आणि Arjun बनले 'मुन्नाभाई आणि सर्किट'

इंटरनेट सेन्सेशन असलेली सारा तेंडूलकर सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असते. 

Sara Tendulkar आणि Arjun बनले 'मुन्नाभाई आणि सर्किट'

मुंबई :  इंटरनेट सेन्सेशन असलेली सारा तेंडूलकर सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच तिने भाऊ अर्जुन तेंडूलकर सोबतचा फोटो पोस्ट केलाय. या फोटोची सोशल मीडियावर खुपच चर्चा रंगलीय.

क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याची पत्नी अंजली, मुलगी सारा तेंडुलकर आणि मुलगा अर्जुन तेंडुलकर यांच्यासह युनायटेड किंगडममध्ये सुट्यांचा आनंद घेतायत. या सुट्टयांदरम्यान काढलेले फोटो ती सध्या सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. 

साराने तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकरसोबत 'मुन्ना भाई आणि सर्किट' अशी पोज देतानाचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमुळे संजय दत्त आणि अर्शद वारसी यांनी साकारलेल्या लोकप्रिय बॉलीवूड पात्रांचं रिक्रिएशन केल्याचे या फोटोवरून दिसतेय. साराने पोस्ट केलेल्या फोटोची खुपचं चर्चा रंगलीय. 

फोटोत काय़ ?
फोटोमध्ये सारा सर्किट बनलीय तर अर्जुन मुन्ना भाई झाला सारा तेंडुलकरने या फोटोखाली मुन्नाभाई आणि सर्किटचा फोटोही टाकला आहे. सारा आणि अर्जुननेही हुबेहुब मुन्नाभाई आणि सर्किटसारखे मॅचिंग कपडे घातले आहेत. त्यामुळे या फोटोची खुपच चर्चा रंगलीय. 

fallbacks

दरम्यान सोशल मीडियावर या फोटोने चांगलाच धुमाकूळ घातलाय. तसेच साराच्या य़ा फोटोवर चाहते तुफान कमेंट करतायत.  

Read More