Marathi News> मनोरंजन
Advertisement

Sara Tendulkar ची नवी पोस्ट पाहून तुम्हीही व्हाल थक्क, फोटो व्हायरल होताच चर्चांना उधाण

साराच्या नव्या पोस्टवरून अनेकांच्या नजरा हटेना... खुद्द सचिनच्या लेकीने फोटो पोस्ट केल्यानंतर चर्चांना उधाण  

Sara Tendulkar ची नवी पोस्ट पाहून तुम्हीही व्हाल थक्क, फोटो व्हायरल होताच चर्चांना उधाण

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय नसली, तरी तिच्या चाहत्यांची संख्या मात्र फार मोठी आहे. साराची क्यूट स्माईल प्रत्येकाला घायाळ करते. अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर कायम जिची चर्चा रंगते ती म्हणजे सारा तेंडूलकर. आता पुन्हा सारा नव्या  फोटोंमुळे चर्चेत आली आहे. पण आता समोर आलेल्या फोटोंमध्ये साराच्या हातावर रंगलेली मेहंदी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. साराने इन्स्टाग्रामवर मेहंदीचे फोटो पोस्ट केले आहेत. 

साराच्या हातावरची मेहंदी पाहून, कोणाच्या नावाची मेहंदी? असा प्रश्न चाहत्यांनी विचारला आहे. तर साराने बहिनीच्या लग्नासाठी मेहंदी काढली असून 'माझी बहिन लग्न बंधनात अडकणार आहे....' असं कॅप्शन दिलं आहे. सध्या साराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.  

fallbacks

दरम्यान, साराने आपल्या सौंदर्याने बॉलिवूडमधील अभिनेत्रींना देखील मागे टाकलं आहे. सारा नुकतीच मॉडलिंगमध्ये उतरली होती. तिचे मॉडलिंगचे फोटो भलतेच व्हायरल झाले आहेत. लोकांना साराची शैली फारच आवडते. ज्यामुळे सारासंदर्भात कोणतीही बातमी किंवा माहिती जाणून घेण्यासाठी चाहाते कधीही मागे हटत नाहीत.

fallbacks

सारा खरंच बॉलिबूडमध्ये येणार का? याबद्दल जाणून घेऊ
ताज्या माहितीनुसार, साराला बॉलिवूडमध्ये करिअर करायचे आहे आणि तिला चित्रपटांमध्ये खूप रस आहे. बॉलीवूड लाइफमधील सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध झालेल्या बातमीत असे सांगण्यात आले आहे - सारा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते.

साराला अभिनयात खूप रस आहे आणि तिने अभिनयाचे धडेही घेतले आहेत. साराने लंडन विद्यापीठातून वैद्यकीयशास्त्रात शिक्षण घेतले आहे. मात्र, तिला ग्लॅमरच्या दुनियेत करिअर करायचे आहे.

 

Read More