Marathi News> मनोरंजन
Advertisement

लिपस्टिक, मेकअप आणि ओपन शर्ट... Sara Tendulkar नक्की निघाली तरी कुठे?

सारा तेंडुलकरचा 'तो' ग्लॅमरस लूक... तिला पाहून चाहते थक्क.... पाहा व्हिडीओ   

लिपस्टिक, मेकअप आणि ओपन शर्ट... Sara Tendulkar नक्की निघाली तरी कुठे?

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिने मॉडेलिंग जगतात एन्ट्री केली आहे. आता सारा बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. साराप्रमाणेच अनेक स्पोर्ट्स स्टार्सची मुलं आहेत ज्यांनी इंडस्ट्रीत प्रवेश केला आहे. इंडस्ट्रीत येण्यापूर्वीच साराने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवलं आहे. साराचे इन्स्टाग्रामवर 1.6 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. 

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सारा सतत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

व्हिडीओमध्ये साराचा मेकअप.. लिपस्टिक आणि पांढऱ्या रंगाच्या ओपन शर्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. व्हिडीओमध्ये  प्रचंड ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सारा अद्याप अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची प्रत्येक चाहत्याची  इच्छा असते. 

तिच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. एका चाहत्याने तर सारा कमेंटमध्ये 'सो क्यूट सारा...' असं लिहिलं आहे. फोटोमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहे. 

एवढंच नाही तर, सारा तेंडुलकरने नुकतेच मॉडेलिंग करिअर सुरू केले आहे. आता तिच्या बॉलिवूड डेब्यूच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. पण तिने अद्याप बॉलिवूड पदार्पणाबाबत माहिती दिलेली नाही.

Read More