Marathi News> मनोरंजन
Advertisement

satish kaushik | सतीश कौशिक यांची प्रकृती अचानक खालावली

 सतीश कौशिक यांना कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच

satish kaushik | सतीश कौशिक यांची प्रकृती अचानक खालावली

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते सतीश कौशिक यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  सतीश कौशिक यांना कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना करोनाची लागण झाली होती. सतीश कौशिक गेल्या काही दिवसांपासून होम क्वारंटाईन होते. यासंदर्भातली माहिती खुद्द सतीश कौशिक यांनी स्वतः ट्विट करुन  दिली होती.

पण काही वेळापूर्वीच त्याची प्रकृती अचानक खालावली, त्यांना त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. उपचारासाठी आता सतीश कौशिक यांना  मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल आहे.  

कोव्हिड-19ची लस आली असली, लोकांनी ही लस घेण्यास सुरुवात केली असली आहे. अद्याप कोरोनाचा धोका कमी झालेला नाही. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, नीतू कपूर, अर्जुन कपूर, वरुण धवन यासारखे अनेक  दिग्दज सेलेब्रिटी या कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकले होते. 

Read More