Marathi News> मनोरंजन
Advertisement

बॉलिवूड अभिनेत्याच्या आईला कोरोनाची लागण, नानावटी रूग्णालयात दाखल

अभिनेत्याने शेअर केली पोस्ट 

बॉलिवूड अभिनेत्याच्या आईला कोरोनाची लागण, नानावटी रूग्णालयात दाखल

मुंबई : कोरोनाने सगळ्यांनाच आपल्या विळख्यात ओढलं आहे. बॉलिवूड अभिनेता सत्यजीत दुबे यांच्या आईला देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून अभिनेत्याने स्वतः माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. आपल्या आईसोबतचा फोटो देखील शेअर केला आहे. 

सत्यजीत दुबे यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आईसोबतचा फोटो पोस्ट करून त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून माझी आई, माझी बहिण आणि मी कठीण प्रसंगाला सामोरं जात आहोत. काही दिवसांपासून माझ्या आईची तब्बेत ठीक नाही. तिला मायग्रेनचा त्रास आहे. ताप आल्यामुळे अंग दुखत होतं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

We shall over come, sooner than later. Love and light.

A post shared by सत्यजीत/Satyajeet Dubey (@satyajeetdubey) on

कोरोनाची चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह निघाली. आता त्यांना नानावटी रूग्णालयात विलगीकरण विभागात दाखल करण्यात आलं आहे. मला आशा आहे ती लवकरच ठणठणीत बरी होऊन घरी येईल. मला आणि माझ्या आईला कोणतीच लक्षण जाणवली नाहीत. 

सत्यजीत यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये कोरोना वॉरिअर्सचं कौतुक केलं आहे. त्यांनी मित्र-परिवार, बीएमसी वर्कर आणि डॉक्टरांचे आभार मानले आहे. त्यांच प्रेम अभूतपूर्व असल्याचं म्हटलं आहे. सत्यजीत यांनी संजय दत्त यांच्या 'प्रस्थानम' मध्ये काम करून लोकप्रियता मिळवली आहे.

Read More