Marathi News> मनोरंजन
Advertisement

चला हवा येऊ द्याच्या मंचावर रंगली 'सौंदर्य स्पर्धा'

चला हवा येऊ द्याच्या मंचावर रंगली 'सौंदर्य स्पर्धा'

मुंबई : चला हवा येऊ द्याचा मंच हा प्रेक्षकांना मनापासून हसवत असतो. आता या मंचावर मराठीतील टॉप अभिनेत्री आल्या आहेत. यामध्ये तेजस्विनी पंडीत,स्पृहा जोशी, प्रार्थना बेहरे आणि रिंकु राजगुरू उपस्थित आहेत. या व्हिडिओ आपण पाहू शकतो की चला हवा येऊ द्याची संपूर्ण टीम प्रेक्षकांना हसवत असते. या मंचावर 'सौंदर्य स्पर्धा' भरली आहे. यामध्ये शांताबाई, पाठक बाई उपस्थित आहे. यांनी रॅम्पवॉक केला असून सौंदर्य स्पर्धेत अनेक प्रश्नांना उत्तर दिली आहेत. 

यामध्ये श्रेया बुगडेने तेजस्विनीची अॅक्टिंग केली आहे. तेजस्विनीचा तेजाज्ञा हा ब्रँड आहे. यामध्ये श्रेयाने तेजाज्ञाचा ड्रेस घातला आहे. आणि सगळेजण तिला गोधडी घालून आलीस का? असं म्हटलं आहे. या जोकवर स्वतः तेजस्विनी देखील भरभरून हसते. चला हवा येऊ द्याचे हे व्हिडिओ सध्या प्रेक्षकांच्या पसंतीला पडत आहेत. 

 

 

Read More