Marathi News> मनोरंजन
Advertisement

सैफ अली खानला झालेली 5 स्टार हॉटेलमध्ये उद्योजकाकडून मारहाण; करिना, करिष्मा, मलायकासमोरच...

Saif Ali Khan Case: ज्यावेळी हा प्रकार घडला तेव्हा सैफबरोबर करिना कपूर, करिष्मा कपूर, मलायका अरोरा यांच्यासोबतच इतरही अनेक मित्र-मैत्रिणी होत्या.

सैफ अली खानला झालेली 5 स्टार हॉटेलमध्ये उद्योजकाकडून मारहाण; करिना, करिष्मा, मलायकासमोरच...

Saif Ali Khan Case:  बॉलिवूडची अभिनेत्री अमृता अरोरा लाडकने शनिवारी मुंबईमधील कोर्टात एका प्रकरणात साक्ष नोंदवताना अभिनेता सैफ अली खानबद्दल एक धक्कादायक दावा केला आहे. 2012 साली सैफ अली खानने मुंबईतील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये एका एनआरआय उद्योजकांबरोबरच त्याच्या वडिलांवर हल्ला केल्याच्या प्रकरणात साक्षीदार म्हणून अमृताने आपली साक्ष कोर्टासमोर नोंदवली.

नेमकं घडलं काय?

हॉटेलमधील हाणामारीचा सारा घटनाक्रम 22 फेब्रुवारी 2012 रोजी झाला. अभिनेता सैफ अली खान काही सहकाऱ्यांसोबत रात्रीच्या जेवणासाठी हॉटेलमध्ये गेला होता. या सहकाऱ्यांमध्ये अमृताही होती. अमृताने कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या ग्रुपला हॉटेलने एक वेगळी जागा दिली होती. सर्वजण आनंदात मज्जा, मस्ती आणि गप्पा करत जेवणाचा आनंद घेत होते. अचानक या ठिकाणी तक्रारदार उद्योजक आला आणि त्याने आराडाओरड करण्यास आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. "आम्ही बसलेल्या ठिकाणी कोणीतरी तावातावात चालत आल्याचं आम्ही पाहिलं. फार मोठ्या आवाजात आणि आक्रमकपणे ही व्यक्ती आम्हाला शांत बसा आणि तसेच बसून राहा असं सांगत होती. नेमकं काय घडलंय हे आम्हाला कळला नाही मात्र आम्हाला मोठा धक्का बसला," असं अमृताने सांगितलं. अचानक सैफ अली खान उभा राहिला आणि त्याने माफी मागितली, असंही अमृताने सांगितलं. त्यानंतर ही व्यक्ती निघून गेली आणि सैफबरोबर आलेल्या सहकऱ्यांनी पुन्हा जेवणास सुरुवात केली.

सैफ अली खानला मारहाण

त्यानंतर सैफ अली खान वॉशरुममध्ये गेला. त्यावेळी त्या वॉशरुममध्ये मोठ्याने आवाज येत होते. त्यापैकी एक आवाज सैफ अली खानचा होता, असंही आमृताने कोर्टाला सांगितलं. त्यानंतर एक व्यक्ती सैफ अली खानला मारहाण करताना दिसली, असंही अमृता जबाब नोंदवताना म्हणाली. आमच्यासोबतच्या अनेकांनी मध्यस्थी करुन त्या दोघांना एकमेकांपासून दूर केलं. त्यावेळी तो माणूस आम्हालाही शिव्या देऊ लागला. तो आम्हाला याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असं म्हटल्याची माहिती अमृताने दिली.

करिनाही होती सोबत

ज्यावेळी हा सारा प्रकार घडला त्यावेळी सैफ अली खान हा अमृताबरोबरच करिना कपूर, करिश्मा कपूर, मलायका अरोरा खान, अमृता राव आणि इतर काही मित्रांसोबत घडला. ज्या उद्योजकाबरोबर सैफचा वाद झाला त्याचं नाव इक्बाल शर्मा असं होतं. सैफ आणि त्याच्या मित्रांनी माझे सासरे रमण पटेल यांना मारहाण केल्याचा आरोप इक्बाल शर्माने केला आहे.

या प्रकरणावर सैफचं म्हणणं काय?

मात्र या प्रकरणामध्ये सैफ अली खानने इक्बाल शर्मानेच आपल्याबद्दल वादग्रस्त शब्द वापरत आरडाओरड करत अंगावर धावून आल्याने वाद झाल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानने इक्बाल शर्माला धमकी देत नाकावर बुक्की मारल्याचा दावा केला आहे. या प्रकरणामध्ये सैफ आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More