Marathi News> मनोरंजन
Advertisement

ऋतुराज गायकवाडचा लग्नातील फोटो शेअर करत Sayali Sanjeev म्हणाली...

Sayali Sanjeev Shared Photo Of Ruturaj Gaikwad : सायली संजीवनं ऋतुराज गायकवाडच्या लग्नानंतर सोशल मीडियावर त्याचा आणि त्याची पत्नी उत्कर्षाचा एक फोटो शेअर केला आहे. सायलीनं शेअर केलेला हा फोटो व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरला आहे. 

ऋतुराज गायकवाडचा लग्नातील फोटो शेअर करत Sayali Sanjeev म्हणाली...

Sayali Sanjeev Shared Photo Of Ruturaj Gaikwad : टीम इंडियाचा युवा फलंदाज आणि मराठमोळा क्रिकेटर ऋतुराज गायकवाड कालच लग्न बंधनात अडकला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्याच्या लग्नाच्या कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याच्या लग्नाआधी मेहंदी, हळद असे विविध कार्यक्रम झाले. काल आपल्या सगळ्यांच्या लाडक्या ऋतुराज गायकवाडनं उत्कर्षा पवारसोबत सप्तपदी घेतल्या. तर त्या दोघांना सेलिब्रिटींपासून त्यांच्या चाहत्यांपर्यंत सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. अशात लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवने देखील त्या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

सायलीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ऋतुराज आणि उत्कर्षाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ऋतुराज आणि उत्कर्षा हे लग्नाच्या जोड्यात स्टेजवर असल्याचे दिसत आहे. त्यांचा हा फोटो शेअर करत सायली म्हणाली की तुम्हा दोघांसाठी खूप आनंदी आहे. लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. सायलीनं शेअर केलेल्या या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

fallbacks

खरंतर गेल्या काही दिवसांपासून ऋतुराज आणि सायली संजीव या दोघांची नाव जोडली जात होती. ते दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यान, सायली अनेकवेळा या सगळ्या अफवा आहे असं म्हणत होती. तर गेल्या आठवड्यात ऋतुराजनं चेन्नई सुपर किंग्सनं आयपीएलची ट्रॉफी जिंकल्यानंतर उत्कर्षासोबत फोटो शेअर केला होता. आता त्यांच्या लग्नाच्या बातमीनं सगळ्यांना आनंद झाला आहे. ऋतुराज आणि उत्कर्षाच्या लग्नात नातेवाईक आणि काही जवळच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. ऋतुराज आणि उत्कर्षानं शेअर केलेल्या फोटोवर अनेक मराठी कलाकारांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होण्याआधी त्यांच्या लग्नाच्या समारंभात असलेल्या एका बोर्डनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या बोर्डवर . “काय जोडी आहे…ऋतुराज caught उत्कर्षा” असं लिहिण्यात आलं आहे. ऋतुराजच्या लग्नाची तारीखही यावर लिहिण्यात आली आहे. ऋतुराजच्या हातावर असलेल्या मेहंदीचा फोटो देखील व्हायरल झाला होता. या फोटोत ऋतुराजच्या हातावर उत्कर्षाच्या नावाची मेहेंदी काढल्याचं फोटोत पाहायला मिळत आहे. ऋतुराजच्या एका हातावर लग्नाची तारीख लिहिण्यात आली आहे. तर दुसऱ्या हातावर दोघांच्याही नावाचे इंग्रजीतील पहिले अक्षर घेऊन बॅट व बॉलचं उत्कृष्ट डिझाइन काढण्यात आलं आहे. ऋतुराजच्या या मेहेंदीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : वडिलांना अभिनय क्षेत्र मान्य नसताना Namrata Sambherao चा होता एकच हट्ट, म्हणाली...

ऋतुराजची होणारी पत्नी उत्कर्षा पवार ही देखील एक क्रिकेटपटू आहे. उत्कर्षा 25 वर्षांची असून तिचं बालपण पुण्यात गेलं आहे. ऋतुराज व उत्कर्षा गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याचं सांगितलं जात आहे

Read More