Marathi News> मनोरंजन
Advertisement

धक्कादायक : कॅन्सरवर मात देणाऱ्या अभिनेत्रीची लहान केंसामुळे शोमधून हाकलपट्टी

हा अनुभव शेअर करताना अभिनेत्रीने जीवनातील चढ-उतारांबद्दल सांगितलं.

धक्कादायक : कॅन्सरवर मात देणाऱ्या अभिनेत्रीची लहान केंसामुळे शोमधून हाकलपट्टी

मुंबई : कॅन्सरवर लढाई देणारी अभिनेत्री  लीजा रे (Lisa Ray) हेल्थी लाईफस्टाईल जगण्यावर विश्वास ठेवते. सोशल मीडियावर नेहमीच नेहमीच आपण तिचे व्हिडिओ पाहिले असतील. २००९ साली लिजा रेला  बोन मॅरो (Bone Marrow) कॅन्सर झाला. कॅन्सरनंतर ती आपल्या पायावर व्यवस्थित उभीही राहू शकत नव्हती. मात्र नंतर स्टेम सेल ट्रांसप्लांटची मदत घेवून लीजा रे कँन्सर फ्री झाली. आज कसूर फेम अभिनेत्री हैल्थी लाईफस्टाईल जगत आहे.

लिसा रे यांना दोन जुळ्या मुली आहेत. अभिनेत्रीने 2012 मध्ये लग्न केलं. कर्करोगमुक्त झाल्यानंतर तीन वर्षांनी त्यांच्या आयुष्यात बदल सुरू झाले. अलीकडेच, तिच्या कर्करोगाच्या प्रवासाबद्दल बोलताना, लिसा रेने सांगितले की, कर्करोग इतका वाढला होता की तिच्या शरीरातील लाल रक्तपेशींची संख्या कमी होऊ लागली. डॉक्टर आश्चर्यचकित झाले की, ती तिच्या पायावर कशी उभी आहे?

कर्करोगमुक्त झाल्यानंतरचा प्रवास सोपा नव्हता
हा अनुभव शेअर करताना लिसा रे यांनी जीवनातील चढ-उतारांबद्दल सांगितलं. लिसा रे म्हणाल्या, "माझ्या शरीरातील लाल रक्तपेशींची संख्या इतकी कमी झाली होती की, मला कधीही हृदयविकाराचा झटका येऊ शकत होता. त्यावेळी डॉक्टरांना हे सांगायचं नव्हतं. डॉक्टरांनी माझ्या ब्लड रिपोर्ट पहिले.

अनेक महिन्यांपासून मला माझ्या शरीरात थकवा जाणवत होता. पण मी लक्ष दिलं नाही. माझ्यासोबत असं काही होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. काही तपासण्या केल्यावर डॉक्टरांनी मला बोन मॅरो कॅन्सर झाल्याचं सांगितलं. वर्षांनंतर माझं आयुष्य ठप्प झालं. मी दीर्घ श्वास घेतला आणि त्यावर उपचार करण्याचा विचार केला. मी माझ्या आयुष्यात नेहमीच खूप धावपळ केली आहे. माझ्या आयुष्याचा एक भाग रेड कार्पेटशी निगडीत होता, पण जेव्हा मला कॅन्सरची माहिती मिळाली, तेव्हा माझ्या आयुष्याचा दुसरा भाग  स्पिरिचुअल पीस मागत होता.

लिसा रे म्हणाली, "मला नेहमीच एखादं पुस्तक लिहायचं होतं. मला वाटत होतं की, मी स्वतः त्याच्याशी जोडू शकेन. पण कामामुळे मी लिहू शकले नाही. त्यानंतर कर्करोगाने माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. माझी जेव्हा स्टेम सर्जरी झाली तेव्हा मी माझा मृत्यू जवळून पाहिला.

मला तो दिवस आजही आठवतो जेव्हा मी ब्लॉग लिहायला सुरुवात केली. कर्करोगासोबत जगताना कसं वाटतं याबद्दल मी पहिला लेख लिहिला. तो लेख वाचून मोजक्याच लोकांनी माझं कौतुक केलं. कसा तरी धीर आला. उपचारानंतर, मी एका कार्यक्रमात गेले तिथे जाताना मी विग घातला होता. मात्र मला ते घालण्यास सोयीस्कर वाटलं नाही. मी स्वतःला सांगितलं की मला हे करायचं नाही. ते काढून टाक आणि आपले वास्तव स्वीकार. मी बोल्ड लूकमध्ये आले. मी सर्वत्र हेडलाईन्समध्ये होते. पण माझ्यासाठी, माझ्या वास्तविकतेप्रमाणे स्वतःला स्वीकारणे अधिक महत्त्वाचं होतं."

लहान केसांमुळे जेव्हा लिसाच्या हातातून प्रोजेक्ट निघून गेला
"माध्यमांचे माझ्याशी चांगले संबंध नव्हते. केमोथेरपीनंतर मी एका ट्रॅव्हल शोचा भाग झाले. त्यात माझे केस लहान होते. मी त्याला 'केमो कट' असं नाव दिलं, पण चॅनलने मला रिप्लेस केलं. कारण त्यांना  कोणी तरी लांब केस असणारी मुलगी हवी होती.  हे माझ्यासाठी खूप हृदयद्रावक होतं. तीन वर्षांनी मी पुन्हा पब्लिकली आहे. परिस्थिती बदलली होती. मी लग्न करणार होते. ही तीन वर्षे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होती. (Seeing the short hair of actress Lisa Ray removed from the show the haircut was changed due to cancer)

 

fallbacks

वर्षानुवर्षे मी चित्रपट केले, पुस्तके लिहिली, कॅन्सरबद्दल जनजागृती केली, मुलांना जन्म दिला आणि कलेच्या माध्यमातून स्वत:ला पुढे नेलं. जिथे एखादा आजार आपल्याला मृत्यूच्या कडेला ढकलतो, तिथे आयुष्य किती छान आहे याची जाणीव करून दिली हा खूप वेगळा अनुभव होता. मला आज खूप जिवंत वाटत आहे."

Read More