Marathi News> मनोरंजन
Advertisement

संवेदनशील आमिर खानच्या बॉडीगार्ड्सकडे तोडफोडीची भाषा आली कुठून?

अभिनेत्यांच्या बॉडीगार्डसाठी शायनिंग मारणं काही नवीन नाही. आमिर खानच्या बॉडीगार्डसने देखील असंच काहीसं केलं आहे. 

संवेदनशील आमिर खानच्या बॉडीगार्ड्सकडे तोडफोडीची भाषा आली कुठून?

मुंबई : अभिनेत्यांच्या बॉडीगार्डसाठी शायनिंग मारणं काही नवीन नाही. आमिर खानच्या बॉडीगार्डसने देखील असंच काहीसं केलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आमिर खानला शपथविधी समारोहासाठी निमंत्रण दिल्याचं म्हटलं जात आहे. याविषयी आमिर खानची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी, मुंबईतील वांद्रे येथील आमिर खानच्या घराबाहेर झी मीडियाची टीम पोहोचली. 

आमिर खान घराबाहेर निघाल्यानंतर, त्याची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावर आमिर खानने फक्त हात हलवला, पण यात काहीही समजलं नाही.

आमिर शपथविधीला जाणार का, हे जाणून घेण्यासाठी टीम आमिरच्या गाड़ीमागे गेली. यानंतर आमिरच्या बॉडी गार्डसने झी मीडियाच्या टीमला धमकी दिली, एवढंच नाही तर तुमचं कॅमेरे देखील तोडून टाकू असं सांगितलं.

अनेकवेळा काही विषयांवरील प्रतिक्रिया जाणून घेणे महत्वाचे ठरते, म्हणून सेलिब्रिटींकडून याची उत्तरं मिळवणे देखील महत्वाचं ठरतं, पण येथे 'चहापेक्षा किटली गरम', अशी परिस्थिती झाली आहे.

आमिर खानच्या पाणी फाऊंडेशनचं एकूण काम पाहता, तसेच आमिर खानची एक संवेदनशील अभिनेता म्हणून प्रतिमा आहे. अशा अभिनेत्यासोबत सतत राहूनही या बॉडीगार्ड्सकडे एवढ्या हिंसक भाषेचा, आणि तोडफोड करण्याचं मनात कसं येतं, हा प्रश्न आमिर खानच्या चाहत्यांना सतावणारा आहे.

Read More