Marathi News> मनोरंजन
Advertisement

त्याग म्हणजे काय हे तिनं दाखवलं; अध्यात्मासाठी अभिनय कारकिर्दीला मराठमोळ्या अभिनेत्रीचा ‘रामराम’

यात सातत्य राखण्यात मात्र आपल्या वाट्याला हवं तितकं यश येत नाही.

त्याग म्हणजे काय हे तिनं दाखवलं; अध्यात्मासाठी अभिनय कारकिर्दीला मराठमोळ्या अभिनेत्रीचा ‘रामराम’

मुंबई : मोह, मत्सर आणि माया या साऱ्यापासून दूर नेत अध्यात्म मानवी शरीराला शांततेच्या आणि चिरशांतीच्या मार्गावर नेतं. धकाधकीच्या जीवनामध्ये अध्यात्माची नेमकी किती गरज आणि महत्त्वं आहे हे आपण कमीजास्त प्रमाणआत सर्वजण जाणतो. किंबहुना अध्यात्माच्या दिशेनं जाण्याचा अनेकदा प्रयत्नही केला जातो. पण, यात सातत्य राखण्यात मात्र आपल्या वाट्याला हवं तितकं यश येत नाही.

एका गाजलेल्या मालिकेतील मराठमोळ्या अभिनेत्रीनंही हा प्रयत्न केला आणि अखेर तिनं अध्यात्माच्या मार्गाचीच निवड करत भरात आलेली कारकिर्द आणि मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.

एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तिनं सर्वांच्या नजरा वळवल्या आणि अनेकांच्याच भुवया उंचावल्या. ही अभिनेत्री आहे, अनघा भोसले. ‘अनुपमा’ या अतिशय लोकप्रिय मालिकेत अनघा नंदिनीची भूमिका साकारत होती.

लोकप्रियतेची तिला काहीच कमतरताही नव्हती. पण, अखेर तिनं स्वत:च्या अंतर्मनाचा ठाव घेत त्याचं म्हणणं ऐकलं.

सोशल मीडियावर एक लक्षवेधी पोस्ट लिहित अनघा म्हणाली,

‘हरे कृष्ण. कार्यक्रमात मी दिसत नसल्यामुळे तुम्ही सर्व चिंतेत आहात. तुमच्या या प्रेमासाठी मी तुमची ऋणी असेन. पण, आता मी सांगू इच्छिते की मी अधिकृतपणे चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हीजन विश्वाला अलविदा केलं आहे.

तुम्ही सर्वांनीच माझ्या या निर्णयाचा आदर करत मला साथ द्यावी ही अपेक्षा. अध्यात्माचा मार्ग निवडत मी हा निर्णय घेतला आहे’. आपण देवाचीच देणगी असून ज्या हेतुसाठी आपण जन्म घेतला आहे तो पूर्ण करणंही गरजेचं असल्याचं तिनं या पोस्टमधून म्हटलं.

fallbacks

आपली काळजी करणाऱ्यांसाठी व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत माहिती देतच राहीन अशी हमीही तिनं दिली. अनघाचा हा निर्णय अनेकांनाच धक्का देणारा होता. कारण अध्यात्मासाठी तिचं हे समर्पण आणि त्याग खूप काही सांगून गेला होता.

Read More