Marathi News> मनोरंजन
Advertisement

लोकप्रिय अभिनेता म्हणतोय, 'अखेर मी कोरोनामुक्त'

कोरोनाचा संसर्ग झाल्याचं कळताच त्याने... 

लोकप्रिय अभिनेता म्हणतोय, 'अखेर मी कोरोनामुक्त'

मुंबई : CoronaVirus कोरोना विषाणूचा संसर्ग विचार करण्यापूर्वीच अतिशय वेगाने झाला. पाहता पाहता जगभरातील अनेक राष्ट्र या विषाणूच्या विळख्यात आली. दैनंदिन जीवनशैली, व्यवहार, कामकाज सारंकाही या कोरोनाच्या दहशतीमुळे ठप्प झालं. कलाविश्वालाही याचा फटका बसला. किंबहुना जरा जास्तच बसला, कारण काही कलाकारांना कोरोनमामुळे आपला जीव गमवावा लागला. 

अतिशय चिंतेच्या अशा या संपूर्ण परिस्थितीमध्ये Game of Thrones  'गेम ऑफ थ्रोन्स', या अतिशय गाजलेल्या सीरिजमधून झळकलेल्या क्रिस्तोफर हिव्ह्यू या अभिनेत्यालाही कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं होतं. कोरोनाचा संसर्ग झाल्याचं कळताच त्याने तातडीने उपचारांनाही सुरुवात केली. ज्यानंतर आता अखेर या विषाणूवर मात करण्यात हा अभिनेता यशस्वी ठरला आहे. 

सोशल मीडियावरवर त्याने एक पोस्ट करत याविषयीची माहिती दिली.  'आम्ही अखेर यातून सावरलो आहोत. मला कोरोना विषाणूची लागण झाली होती, बहुधा माझ्या पत्नीलाही. काही आठवडे क्वारंटाईनमध्ये राहिल्यानंतर आणि आता कोरोनाच्या लक्षणांवरही मात केल्यानंतर आता आम्हाला सुरक्षित वाटत आहे', असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलं. 

 
 
 
 

A post shared by Kristofer Hivju (@khivju) on

 

पत्नीसह फोटो पोस्ट करत त्याने ही दिलासादायक बातमी दिली. ज्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आढळल्याची बाब मांडली. शिवाय चाहत्यांचे आभारही मानले. कोरोनातून सावरलेल्या क्रिस्तोफरने सर्वांनाच कोरोनाशी लढा देत असताना स्वत:ची काळजी घेण्याचंही आवाहन केलं. 

Read More