Marathi News> मनोरंजन
Advertisement

शबाना आझमी यांनी का केला होता स्वतःला संपवण्याचा प्रयत्न? ते ही एक नव्हे तर दोन वेळा!

Shabana Azmi Suicide : शबाना आझमी या सध्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातील त्यांच्या किसिंग सीनमुळे चर्चेत आहे. शबाना आझमी यांनी लहान असताना 2 वेळा स्वत: चा जीव संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्याविषयी त्यांच्या आईनं त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे. 

शबाना आझमी यांनी का केला होता स्वतःला संपवण्याचा प्रयत्न? ते ही एक नव्हे तर दोन वेळा!

Shabana Azmi Sucide : बॉलिवूड दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी गेल्या अनेक दिवसांपासून 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटातील त्यांचा आणि धर्मेंद्र यांचा किसिंग सीन चर्चेचा विषय ठरला होता. शबाना आझमी यांनी 1974 मध्ये त्यांच्या अभिनयातील करिअरला सुरुवात केली होती. त्यांना तीन वर्षांसाठी सतत नॅशनल अवॉर्ड देखील मिळाला होता. सीरिअस दिसणाऱ्या शबाना लहाण असताना खूप हट्टी आणि मस्तीखोर होत्या. शबाना यांची आई शौकत आजमी यांचं पुस्तक 'कैफी एंड आय: ए मेमोरी' मध्ये या गोष्टीचा उल्लेख केला आहे. शबाना यांनी दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा देखील त्यात सांगितले होते. 

शबाना आझमी यांच्या आई शौकत आझमी यांनी त्यांच्या ऑटोबायोग्राफीत या विषयी सांगितलं होतं. शबाना यांनी दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. शबाना या फक्त 9 वर्षांच्या होत्या, जेव्हा त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. खरंतर शबाना यांना एका गोष्टींविषयी गैरसमज झाला होता की त्यांची आई त्यांच्या पेक्षा त्यांच्या भावावर जास्त प्रेम करतात. एकदा शाळेत पाठवताना घाई झाली होती, तेव्हा शबाना यांच्या आईनं त्यांच्या प्लेटमधला ब्रेड त्यांच्या भावाच्या प्लेटमध्ये ठेवला होता. या गोष्टीवरून शबाना इतक्या नाराज झाल्या की शाळेतील लॅब मध्ये जाऊन त्यांनी केमिकल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याशिवाय आणखी एकदा शबाना यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. शबाना या नेहमीच हट्ट करतात हे पाहता त्यांची आई त्यांना म्हणाल्या की तू घर सोडून निघून जा. या गोष्टीवर शबाना यांना इतका राग आला की त्या ट्रेन समोर जीव देण्यासाठी गेल्या होत्या. पण त्यांना तिथल्या एका व्यक्तीनं पाहिलं आणि परत घरी आणून सोडलं. शबाना यांना पाहता त्यांनी असं काही लहाण असताना केलं असेल याचा विचार कोणालाच आला नसेल. 

हेही वाचा : 'या' चिमुकलीला ओळखलत का? कधी फक्त एक वेळ जेवायची अन् आज 101 कोटी संपत्तीची मालकीण

दरम्यान, शबाना यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर सध्या त्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांनी या चित्रपटात धर्मेंद्र यांच्या एक्स गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेनं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर त्यांची आणि धर्मेंद्र यांची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

Read More