Marathi News> मनोरंजन
Advertisement

Isha Ambani Wedding:हिलरी क्लिंटन यांनी डान्सफ्लोअरवर उडवली धमाल!

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन हे सुद्धा आपल्या मुलीसह पार्टीत सहभागी झाले होते.

Isha Ambani Wedding:हिलरी क्लिंटन यांनी डान्सफ्लोअरवर उडवली धमाल!

मुंबई - रिलायन्स उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची मुलगी इशा हिचा विवाहसोहळा सध्या देशवासियांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. या विवाहसोहळ्याच्या वेगवेगळ्या बातम्या, व्हिडिओ रोजच्या रोज पुढे येतात आणि त्यावर सोशल मीडियामध्ये चर्चा होते आहे. इशा अंबानीच्या विवाहपूर्व सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची पत्नी हिलरी क्लिंटन अभिनेता शाहरुख खानसोबत हिंदी गाण्यावर नाचताना दिसत आहे. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

या व्हिडिओमध्ये हिलरी क्लिंटन यांच्यासोबत शाहरुख खान, खुद्द मुकेश अंबानी, आमीर खान, नीता अंबानी यांच्यासह विविध सेलिब्रिटी पाहुणे थिरकताना दिसताहेत. अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन हे सुद्धा आपल्या मुलीसह पार्टीत सहभागी झाले होते. ते देखील वेगवेगळ्या गाण्यांवर नाचताना पाहायला मिळत आहे. 

काही दिवसांपूर्वी दीपिका पदुकोण आणि ऐश्वर्या राय यांचाही एक व्हिडिओ असाच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दीपिका काही दिवसांपूर्वीच अभिनेता रणवीर सिंगशी विवाहबद्ध झाली. गेल्या महिन्यात १४ नोव्हेंबरला कोकणी पद्धतीने आणि दुसऱ्या दिवशी सिंधी पद्धतीने दोघे लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांच्या लग्नावेळी कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्याचा कोणताही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला नाही.

इशा अंबानीच्या विवाहानिमित्त अँटेलिया या त्यांच्या निवासस्थानाला एखाद्या वधूसारखे सजविण्यात आले आहे. याच निवासस्थानी इशा आणि व्यावसायिक आनंद पिरामल विवाहबद्ध होणार आहेत.

Read More