Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : अंबानींच्या लग्नात अमिताभ-शाहरुख-आमिर बनले वाढपी

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल  यांच्या लग्नासाठी बॉलीवूड, उद्योगजगत, राजकारण क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते

VIDEO : अंबानींच्या लग्नात अमिताभ-शाहरुख-आमिर बनले वाढपी

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानी आणि आनंद पिरामल लग्नबंधनात अडकलेत. १२ डिसेंबरला दोघं रेशीमगाठीत अडकले. या शाही विवाह सोहळ्याला बॉलीवूडचे सेलिब्रिटी, राजकारणी मंडळी, देश-विदेशातले मान्यवर उपस्थित होते. या लग्नातील एक व्हिडीओ समोर आलाय. ईशाच्या लग्नातील या व्हिडीओमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन, बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान वाढपी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

हे तिघेही लग्नातील पाहुण्यांना जेवण वाढत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसतंय. आमीरनेही वऱ्हाडी मंडळींच्या पाहुणचारामध्ये काहीही कमतरता राहणार नाही याची काळजी घेतल्याचं यांत दिसतंय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Smile Why coz you can (@velvety67) on

उद्योगपती मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या लग्नानिमित्त मुंबईत शुक्रवारी रात्री विशेष स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्वागत समारंभ सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.

यात बॉलीवूड, उद्योगजगत, राजकारण क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते. ईशा आणि आनंद १२ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. या लग्नासाठी हजारो कोटी खर्च करण्यात आले.

fallbacks
शाहरुख खान

स्वागत सोहळ्याला ए.आर.रेहमान, उदीत नारायण, शान, हरदीप अशा गायकांनी आपल्या सूरांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. 

Read More