Marathi News> मनोरंजन
Advertisement

पत्नीची काळजी; शाहरूख बनला Caring Husband, गौरीचा हात पकडून पापराझींनाही डावललं

Shahrukh Khan and Gauri Khan: शाहरूख खान आणि गौरी खान यांची अनेकदा चर्चा रंगलेली पाहायला मिळत असते. यावेळी त्यांची विशेष चर्चा रंगलेली आहे. एकमेकांचे हातात हात घेत ते दोघं गदर 2 च्या सेस्केस पार्टीला पोहचले आहेत. 

पत्नीची काळजी; शाहरूख बनला Caring Husband, गौरीचा हात पकडून पापराझींनाही डावललं

Shahrukh Khan and Gauri Khan: सध्या चर्चा आहे ती म्हणजे शाहरूख खानची. काही दिवसांनीच त्याचा जवान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 'जवान' या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकींगही फार जोरात सुरू आहे. त्यामुले बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलीच धमाल उडवून देईल याचीही जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी शाहरूख खान आणि गौरी खान 'गदर 2' या चित्रपटाच्या सेक्सेस पार्टीला हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. गौरी आणि शाहरूखचा रोमॅण्टिक अंदाज यावेळी पाहायला मिळाला होता. त्यामुळे त्या दोघांच्या या रोमॅण्टिक फोटोवर चाहत्यांनी तूफान कमेंट्स केल्या होत्या. समोर आलेल्या फोटोनुसार ते एकमेकांच्या हातात हात घालून जाताना दिसले होते. त्यामुळे त्या दोघांवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला होता. तुम्ही त्या दोघांचा हा फोटो पाहिलात का? या फोटोवर तुमची पहिली प्रतिक्रिया काय बरं असेल? या त्यांच्याविषयी या लेखातून आणखीन जाणून घेऊया. 

शाहरूख खान आणि गौरी खान यांची लव्ह स्टोरी आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यांच्या लव्ह स्टोरीची अनेकदा चर्चा होताना दिसते. यावेळी त्या दोघांनीही एकमेकांचे हात हे हातात घेतले होते त्यामुळे त्यांचा हा रोमॅण्टिक अंदाज पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत. सध्या गदर 2 या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे आणि सोबतच तिची चांगलीच चर्चाही पाहायला मिळाली आहे. परंतु यावेळी शाहरूख हा अगदी गौरीची विशेष काळजी घेताना दिसला होता. त्यामुळे त्याची विशेष चर्चा रंगलेली होती. सगळेच त्याच्या यामुळे कौतुक करत होते. यावेळी तो आणि गौरी खान गदर 2 च्या सेस्केस पार्टीला पोहचले होते. त्यावेळी त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती. यावेळी शाहरूख खान गौरीचा हात पकडून आत शिरला त्यानं पापराझींनाही पोझ दिली नाही. 

हेही वाचा : 8 वर्षांची प्रतिक्षा! प्रत्युष्या बॅनर्जीच्या वडिलांची प्रतिक्रिया म्हणाले, 'आम्ही व्हिलन...'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी सर्वांनीच शाहरूखचे कौतुक केले आहे. एका युझरनं लिहिलंय की, ''बायकोची किती छान काळजी घेतो.'' तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय की, ''फार छान'', अनेकांनी त्याच्या या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. 7 सप्टेंबरला शाहरूख खानच 'जवान' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

Read More