Marathi News> मनोरंजन
Advertisement

तुम्ही एकमेकांना कधी डेट का केलं नाही? जेव्हा शाहरुख-काजोलने केला खुलासा, म्हणाले 'बाजीगरच्या वेळी 6 महिने...'

शाहरुख खान आणि काजोल यांनी एका मुलाखतीत जर आपण सिंगल असतो तर एकमेकांना डेट केलं असतं का? यावर भाष्य केलं होतं.   

तुम्ही एकमेकांना कधी डेट का केलं नाही? जेव्हा शाहरुख-काजोलने केला खुलासा, म्हणाले 'बाजीगरच्या वेळी 6 महिने...'

बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोड्यांचा जेव्हा कधी उल्लेख केला जातो तेव्हा त्यात शाहरुख खान आणि काजोल यांचा उल्लेख होणार नाही हे अशक्यच आहे. करण-अर्जुन, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कभी खुशी कभी गम, कुछ कुछ होता है या चित्रपटांमधील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. दोघांनी केलेला जवळपास प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरला आहे. दिलवाले चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दोघांना तुम्ही सिंगल असता तर एकमेकांना डेट केलं असतं का? असं विचारण्याच आलं होतं. 

जेव्हा त्यांना विचारलं की जर ते दोघेही सिंगल असते तर एकमेकांना डेट केलं असतं का, तेव्हा काजोल म्हणाली, “मला खरंच माहित नाही. कारण मला वाटतं की मी त्यावेळी अजयसह (अजय देवगण) नात्यात होतो. त्यादरम्यान आम्ही बाजीगर चित्रपटासाठी सहा महिने शुटिंग करत होतो”. त्यावर शाहरुखनेही विनोदी पद्धतीने उत्तर दिलं की, “मी पण त्यावेळी अजयला भेटत होतो”.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Showman MJ (@showmanmj123)

शाहरुख आणि काजोल यांनी पहिल्यांदा 'बाजीगर' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात शाहरुख खानने निगेटिव्ह भूमिका साकारली होती. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम' आणि 'माय नेम इज खान' यासारख्या चित्रपटांतील केमिस्ट्रीमुळे ते चाहत्यांच्या आवडत्या जोडींपैकी एक ठरले होते. 

दरम्यान बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच, शाहरुखने सहा वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर हिंदू पद्धतीने गौरीशी लग्न केलं होते. 1997 मध्ये त्यांचा पहिला मुलगा आर्यन आणि 2000 मध्ये मुलगी सुहानाचा जन्म झाला. 2013 मध्ये त्यांनी त्यांच्या तिसऱ्या मुलाचे, अबरामचे स्वागत केलं. दुसरीकडे, काजोलने 1994 मध्ये अजय देवगणला डेट करायला सुरुवात केली आणि 1999 मध्ये अभिनेत्याच्या घरी पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीने त्यांन लग्न केलं. त्यांना मुलगी न्यासा देवगण आणि मुलगा युग देवगण अशी दोन मुलं आहेत.

शाहरुख शेवटचा राजकुमार हिरानी यांच्या 'डंकी' या चित्रपटात दिसला होता, जो व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला. यानंतर तो सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित अॅक्शन थ्रिलरमध्ये दिसणार आहे. 'किंग' नावाच्या या चित्रपटात त्याची मुलगी सुहाना खान आणि अभिषेक बच्चन देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. काजोल 'मा' चित्रपटात दिसणार आहे. विशाल फुरिया दिग्दर्शित हा हॉरर चित्रपट 27 जून 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read More