Marathi News> मनोरंजन
Advertisement

'कभी खुशी कभी गम'मधील छोटा कृष आज दिसतो हँडसम हंक, पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर जिब्रान नेहमी सक्रिय असतो

'कभी खुशी कभी गम'मधील छोटा कृष आज दिसतो हँडसम हंक, पाहा व्हिडिओ

मुंबई : करण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटातील शाहरुख खान आणि काजोलचा मुलगा कृष तुम्हाला आठवत असेलच. चित्रपटात गोंडस दिसणाऱ्या कृषचं खरं नाव जिब्रान खान आहे. छोटा जिब्रान आता 28 वर्षांचा झाला आहे. जिब्रान सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो याचबरोबर तो अनेकदा त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करतो.

कभी खुशी कभी गमला 20  पूर्ण झाल्याने जिबरानने शेअर केला व्हिडिओ
जिब्रानने नुकतेच त्याचे फोटो शेअर केले आहेत. त्याची स्टाईल पाहून तो एखाद्या सुपरस्टारपेक्षा कमी दिसत नाही. असे म्हणणं चुकीचं ठरणार नाही. चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाल्याच्या आनंदात जिब्रानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने चित्रपटातील एक सीन रिक्रिएट केला आहे. ज्यात तो चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग बोलताना दिसत आहे.

व्हिडिओ शेअर करत जिब्रानने लिहिलं की, 'जर तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचं असेल किंवा मिळवायचे असेल तर नेहमी K3G पहा. या चित्रपटामुळे मी कॅमेराच्या प्रेमात पडलो. यासाठी करण जोहरच्या संपूर्ण टीमचे आभार.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

महाभारतात अर्जुनची भूमिका साकारणारा अर्जुन हा फिरोज खानचा मुलगा आहे. जिब्रान अनेकदा त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतो. इतकंच नाही तर व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये त्याचे 6 पॅक बॉडी आणि स्टायलिश स्टाईल पाहून तुम्ही क्षणभर थक्क व्हाल. जिब्रानचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पसंत केले जातात आणि त्यामुळेच त्याचं फॅन फॉलोअर्स खूप मोठं आहे.

Read More