Shah Rukh Khan EMI: बॉलिवूडचा किंग अभिनेता शाहरुख खान हा नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतो. अभिनेत्याने इंडस्ट्रीमध्ये त्याची वेगळीच ओळख निर्माण केली आहे. यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागला आहे. यामधूनच त्याने मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. आता शाहरुख खान हा बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कलाकारांपैकी एक आहे. शाहरुख खानकडे अनेक लक्झरी कार आहेत. मात्र, एक काळ असा होता की, शाहरुख 2-3 शिफ्टमध्ये काम करत होता. एक वेळ अशी आली की शाहरुख खानकडे कारचा EMI भरण्यासाठी देखील पैसे नव्हते. या संदर्भात शाहरुख खानची मैत्रिण जुही चावलाने खुलासा केला आहे.
अभिनेता शाहरुख खान आणि जूही चावला यांनी एकत्र अनेक चित्रपट केले आहेत. यामध्ये डर, राजू बन गया जेंटलमैन, डुप्लीकेट यांसारखे चित्रपटांचा समावेश आहे. चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच ते बिझनेसमध्ये पार्टनर्स आहेत. दोघांनी मिळून IPL टीम कोलकाता नाइट राइडर्स विकत घेतली आहे.
कारचा EMI न भरल्याने बँकने कार केलेली जप्त
जूही चावलाने गुजरात चैंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीच्या एका कार्यक्रमात शाहरुख खानच्या संघर्षाबाबत मोठा खुलासा केला आहे. जूही चावलाने सांगितले की, शाहरुख खानने एक काळ्या रंगाची जिप्सी कार खरेदी केली होती. ही कार शाहरुख खानने EMI वर घेतली होती. या कारचा EMI न भरल्यामुळे बँकने ही कार जप्त केली होती. त्यावेळी जूहीने सांगितेल की, शाहरुख खान हा खूप उदास होऊन शूटिंगसाठी आला होता. त्यानंतर जूहीने त्याला सांगितले होते की तू भविष्यात खूप कार खरेदी करू शकतो. आज शाहरुख खानला तो क्षण आठवतो कारण अभिनेत्रीचे शब्द सत्यात रुपांतरित झाले आहेत.
सध्या शाहरुख खानकडे अनेक लक्झरी कार आहेत. तो आज कोट्यवधींचा मालक आहे. मुंबईत तो समुद्रकिनारी असलेल्या मन्नत बंगल्याममध्ये आपल्या कुटुंबासह राहतो. अभिनेता शाहरुख खानच्या वर्कफ्रंडबद्दल बोलायचं म्हटलं तर शाहरुख खान लवकरच मुलगी सुहाना खानसोबत 'किंग' चित्रपटात दिसणार आहे. शाहरुख खानने या चित्रपटाच्या शूटिंगला देखील सुरुवात केली आहे.