Shah Rukh Khan Mannat Renovation BMC : मालमत्तेच्या नूतनीकरणादरम्यान किनारपट्टी नियमन क्षेत्राचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारीनंतर वन विभाग आणि बीएमसी अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी अभिनेता शाहरुख खानच्या वांद्रे बँडस्टँड येथील बंगल्या मन्नतची तपासणी केली, असे बीएमसी अधिकाऱ्यांनी यांनी सांगितले. मालमत्तेत मन्नत, एक वारसा इमारत आणि एक संलग्न संरचना, एक बहुमजली इमारत समाविष्ट आहे. नूतनीकरणामुळे खान आणि त्याचे कुटुंब जवळच्या ठिकाणी स्थलांतरित झाले असल्याने, अधिकाऱ्यांची त्यांच्या कर्मचाऱ्यांनी भेट घेतली आणि त्यांना मिळालेल्या परवानग्यांबाबत सर्व कागदपत्रे सादर करण्यास सांगितले.
मालमत्तेचे नूतनीकरण सुरू आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीझेडएमए) कडून यापूर्वी मंजुरी मागवण्यात आली होती. नूतनीकरणात संलग्न संरचनेत दोन अतिरिक्त मजले जोडणे समाविष्ट होते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'नूतनीकरण परवानग्यांबद्दल तक्रार मिळाल्याने एका पथकाने जागेची तपासणी केली. निष्कर्षांच्या आधारे अहवाल तयार केला जाईल आणि लवकरच सादर केला जाईल.'
टीमचा भाग असलेल्या एका अधिकाऱ्यानं सांगितले की, साइटवर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले की ते मिळालेल्या परवानग्यांबाबत सर्व कागदपत्रे सादर करतील. बीएमसीच्या एच-वेस्ट वॉर्ड इमारत आणि कारखाना विभाग आणि इमारत प्रस्ताव विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणीसाठी वन पथकासोबत येण्यास सांगण्यात आले. 'वन विभागाच्या विनंतीवरून आमचे अधिकारी पथकासोबत होते. आमची दुसरी कोणतीही भूमिका नव्हती,' असे बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी यापूर्वी मन्नत येथील बांधकामाबाबत बीएमसीकडे तक्रार दाखल केली होती. आता 21 जून रोजी 11 वाजता रिपोर्ट बीएमसी तक्रार करणाऱ्याला देण्यात येणार आहे.
हेही वाचा : सुरक्षेशिवाय नीसा देवगण घराबाहेर पाऊलही टाकू शकत नाही; मुलीसाठी का बनवला हा नियम? काजोलचा खुलासा
शाहरुख खानचं घर मन्नतमध्ये दुरुस्तीचं काम सुरु आहे. तर शाहरुख सध्या या दुरुस्तीमुळे वांद्रेच्या पाली हिलमध्ये एका अपार्टमेंटमध्ये राहतो. असं म्हटलं जातं की मन्नतमध्ये रेनोवेशनचं काम हे जवळपास दोन वर्षांपर्यंत चालेल. त्यामुळे दोन वर्ष तो या अपार्टमेंटमध्येच राहणार आहे. जॅपकीनुसार, शाहरुख खाननं नवीन अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठी 24 लाख रुपये महिन्याला भाडेतत्वाव घेतलं आहे.