Marathi News> मनोरंजन
Advertisement

आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर Shah Rukh Khan ची प्रतिक्रिया

'ड्रग्स प्रकरणात आर्यन अडकल्यानंतर....', मुलाला क्लिन चिट मिळाल्यानंतर शाहरुख खानची प्रतिक्रिया  

आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर Shah Rukh Khan ची प्रतिक्रिया

मुंबई : गेल्या वर्षी ड्रग्स प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अडकला होता. काही दिवसांपूर्वी ड्रग्स प्रकरणात आर्यनला क्लिन चिट मिळाली. ड्रग्ज प्रकरणात मुलगा आर्यन खानला अटक झाल्यापासून शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी मौन बाळगलं. पण क्लिन चिट मिळाल्यानंतर  एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंग यांनी दिलेल्या मुलाखतीत आर्यन खानच्या वक्तव्यावर खुलासा केला आहे.

आर्यन खानसोबस संजय सिंग यांनी संवाद साधला, तेव्हा आर्यनने या प्रकरणावर बोलण्यास संकोच केला. आर्यन म्हणाला, 'सर, तुम्ही मला आंतरराष्ट्रीय ड्रग स्मगलर बनवलं आहे. मी ड्रग्जमध्ये पैसे गुंतवतो. हे आरोप बिनबुडाचे नाहीत का? त्यांना माझ्याजवळ कोणतेही ड्रग्ज सापडले नाही. असं असतानाही त्यांनी मला अटक केली.'

आर्यनच्या वक्यव्यानंतर शाहरुखने दिलेली प्रतिक्रिया देखील चर्चेत आहे. अभिनेता म्हणाला, 'कोणतेही पुरावे नसताना माझ्या मुलाला ड्रग्स प्रकरणात अडकवलं जात आहे. गुन्हेगार असल्याचं आम्हाला वारंवार भासवलं जात होतं. कामाच्या ठिकाणी देखील अनेक गोष्टींचा सामना करावा लागला... '

आर्यन खान ड्रग्स प्रकरण 
आर्यनला ऑक्टोबर 2021 मध्ये NCB अधिकार्‍यांनी मुंबई ते गोव्याच्या क्रूझवर छापा टाकल्यानंतर अटक केली होती. त्यामुळे आर्यन काही दिवस तुरुंगातही होता. पण आता ड्रग्स प्रकरणात क्लिन चिट मिळाल्यानंतर आर्यनने कामाला सुरुवात केली असल्याचं समोर येत आहे. 

Read More