Marathi News> मनोरंजन
Advertisement

Zero सिनेमातील 'इश्कबाजी' गाणं रिलीज

पाहा हे गाणं 

Zero सिनेमातील 'इश्कबाजी' गाणं रिलीज

मुंबई : सलमान खान आणि शाहरूख खान यांना एकाच पडद्यावर पाहणं त्यांच्या चाहत्यांसाठी खूप मोठी पर्वणी असते. अशीच पर्वणी आता चाहत्यांना 'झिरो' सिनेमातून मिळणार आहे. या सिनेमात सलमान खान एका गाण्यात शाहरूखसोबत एक जबरदस्त जुगलबंदी करताना दिसणार आहे. 

या गाण्याची सुरूवात एका सीनने झाली आहे ज्यामध्ये शाहरूख खान कतरिनाला Kiss करत आहे. किसनंतर शाहरूख खान खूप खूष दिसत असून सरळ नाचायला सुरूवात करतो. या गाण्याचा अंदाज बघता शाहरूखला डान्स करताना बघून सलमान खान स्वतःला रोखू शकला नाही. आणि तो देखील स्टेजवर नाचायला लागतो. सलमान आणि शाहरूख यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळेल. 

या गाण्याची कोरिओग्राफी गणेश आचार्य आणि रेमो डिसोझाने केली आहे. या गाण्याला अजय - अतुलने संगीत दिलं असून हे गाणं इर्शाद कामिलने लिहिलं आहे. तसेच हे गाणं सुखविंदर - दिव्या कुमार यांनी गायलं आहे.

Read More