Marathi News> मनोरंजन
Advertisement

मुलासोबत शाहरूखला करायचंय काम पण, कोण ठरतंय मोठा अडथळा?

आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर शाहरूख होता सगळ्यापासून लांब मात्र आता पठाण सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला 

मुलासोबत शाहरूखला करायचंय काम पण, कोण ठरतंय मोठा अडथळा?

मुंबई : शाहरूख खानचा मुलगा अबराम खान यांची लोकप्रियता कोणत्या स्टारपेक्षा काही कमी नाही. शाहरूखच्या चाहत्यांना अबरामला सिल्वर स्क्रिनवर पाहायचं आहे. मात्र या गोष्टीला अजून वेळ आहे. काही वर्षांपूर्वी शाहरूखला अबरामशीसंबंधीत एक प्रश्न विचारला होता. ज्याचं त्याने खूप मजेशीर उत्तर दिलं होतं. 

अबराम खानसोबत करायचंय काम? 

शाहरूख आणि त्याच्या चाहत्यामधील जुनं चॅट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या चॅटमध्ये शाहरूख खानला चाहता विचारतोय की, अबरामसोबत कधी सिनेमा करणार आहे?याचं उत्तर देताना शाहरूख खान म्हणाला की, अबरामच्या डेट्स मिळतील तसा सिनेमा करेन. 

fallbacks

शाहरूखने दिलं मजेशीर उत्तर 

हल्लीच शाहरूख खान AskSRK सेशन ठेवलं होतं. ज्यामध्ये त्याने आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. 

या दरम्यान एका चाहत्याने विचारले की, कुठे आहे डिअर.... सिनेमात येत राहा... बातम्यांमध्ये नको...  शाहरूखने यावर मजेशीर उत्तर लिहिलं. 

..पुढच्या वेळी काळजी घेईन. तेथे त्याने 'खबरदार' या शब्दाचा उल्लेख केला आहे.  यासोबतच त्याने #पठाण हा हॅशटॅग काढला आहे. काही काळापूर्वी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे नाव ड्रग्ज प्रकरणात आले होते, त्यामुळे तो खूप चर्चेत राहिला होता.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

या दिवशी प्रदर्शित होणार पठाण सिनेमा 

विशेष म्हणजे चार वर्षांनंतर शाहरुख खान 'पठाण' या चित्रपटातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर आपली जादू पसरवणार आहे. बुधवारी या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला, त्याला खूप पसंती मिळाली.

शाहरुख खानचा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच तामिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. 

Read More