Shah Rukh Khan On Jihad: पेहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सोशल मीडियावर शाहरुख खानचा एक जुना व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओत शाहरूख खान जिहादचा खरा अर्थ सांगताना दिसत आहे. या व्हिडिओनंतर अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. जम्मू-काश्मीर येथील पेहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 27 जणांनी जीव गमावला आहे. या घटनेमुळं देशात तीव्र संताप दिसून येतोय. दहशतवाद्याला चोख प्रत्त्युत्तर देण्यात यावे, अशी मागणी समस्त भारतीय करत आहेत. या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. याच दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहरुख खानचा कित्येत वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात शाहरुख खान जिहाद शब्दाचा खरा अर्थ सांगताना दिसतोय.
एका कार्यक्रमातील हा व्हिडिओ असून यात शाहरूख खान इस्लाम या धर्माबद्दल सांगताना दिसत आहे. या दरम्यान तो जिहाद या संकल्पनेबाबतही बोलताना दिसत आहे. शाहरुखने म्हटलं आहे की, 'लोक जिहाद या शब्दाचा चुकीचा अर्थ काढतात. मी इस्लाम धर्माचा आहे. मी मुस्लिम आहे. आमच्या येथे एक शब्द खूप चुकीच्या पद्धतीने वापरला जातो. जिहादचा विचारही काहीसा असाच आहे. जिहादचा खरा अर्थ म्हणजे, आपल्या वर्तवणुकीत जी वाईट विचार आहेत त्याच्याविरोधात लढणे. बाहेर रस्त्यावर लोकांना मारणे म्हणजे जिहाद नाही,' सोशल मीडियावर शाहरुख खानचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
शाहरूख खानने गौरीसोबत लग्न केल्यानंतर त्यांच्या घरात हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माचे पालन केले जाते. घरात हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माचे सण साजरे केले जातात. एका मुलाखतीत त्याने याबाबत सविस्तर सांगितले आहे. 'घरात गणेश-लक्ष्मी देवीच्या मूर्तीशेजारीच कुराणदेखील ठेवले आहे. त्याचबरोबर घरात मुलं जेव्हा गायत्री मंत्राचे स्मरण करतात तेव्हाच कुराणबद्दलही बोलतात.'
What is real mean of Zihad By Dr.Shah Rukh Khan.
— ARhan (@arhan4srk) February 18, 2019
Take 20 Seconds to know his answer.
Max Rt if you really appreciate his kind word, Spraed max.#StopFakeNewsAgainstSRK pic.twitter.com/ycWzBrdWsn
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आता पहलगाममधील भयानक दहशतवादी हल्ल्याचा तपास औपचारिकपणे हाती घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना निर्घृणपणे गोळ्या घालून ठार मारण्यात आले. घटनेपासून, एनआयए पथके घटनास्थळी सतत उपस्थित आहेत आणि आता पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया अधिक वेगवान करण्यात आली आहे.